पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ९ वें. १२७ शिक्षा केली. मग गृधोलकांचा बंटाई तोडून गृधास शिक्षा केली. ( ७-१० ). 1794 ( २८ ) वाल्मीकीनें ( ७-१४ मध्यें ) आपला पूर्वजन्म व या जन्मीचें आत्मचरित्र सांगितलें आहे. वाल्मीकि पूर्वजन्मीं कोळी (व्याध ) होता. त्याने एका ब्राह्मणास लुटून त्याचे कर्णकुंडल, जोडे व छत्री हीं हरून घेतलीं; पुढें ( शंख नांवाचा) ब्राह्मण उन्हांत तळपूं लागला, तेव्हां त्यास व्याधानें जोडे व छत्री हीं परत दिली. त्या पुण्यानें पुढील जन्मीं तो व्याध मुनिपुत्र होऊन जन्मला. कृणु नामक मुनि कोणा एका सरोवरावर अन्न वगैरे सोडून तीव्र तप करीत होता. त्याचें तप संपल्यानंतर त्याच्या नेत्रांतून वीर्य गेलें; तें एका नाग- कन्येनें ऋतुकाळीं ग्रहण केलें. तिच्या पोटीं वाल्मीकि जन्मले. त्याचें पालन पोषण किरातांनीं केलें. जन्मानें मात्र द्विजत्व असून तो शूद्राचार- रतच होता; शूदेच्या ठाई पुष्कळ पुत्रांची त्याने उत्पत्तिहि केली. चोरांच्या संगतीस लागून तो चोरी करूं लागला. पुढें सात मुनींची गांठ पडून त्यांनी ' तुझ्या पापाचे वांटेकरी तुझीं बायकापोरें होतात का, हे त्यांस विचारून ये' ह्मणून जेव्हां सांगितलें, तेव्हां त्याच्या डोळ्यांत प्रकाश पडून तेव्हांपासून राम नाम मंत्राचा उपदेश त्यानें त्यांजपासून घेतला, पण तो उलट जपूं लागला. जपतां जपतां त्याच्या अंगांवर वारूळ वाढले म्हणून त्याचें वाल्मीकि असें नांव पडलें. मग पुढें क्रौंचवधानंतर श्लोकस्फूर्ति होऊन त्यानें रामायण रचिलें. इत्यादि हकी- कत यांत थेट लोकांत हल्लीं प्रचलित असल्याप्रमाणेंच आहे. याप्रमाणें वाल्मीकि जात्या ब्राम्हणपुत्र असला तरी त्याचें पूर्ववय, या हकीकतीत तथ्य असल्यास, दुःसंगतींत व दुराचरणांत गेल्याप्रमाणें दिसतें. ( २९ ) कुशाची कन्या हेमा इवें स्वयंवर अयोध्येंत मांडलें असतां अवंतिनाथाचा ( उग्रवाहचा ) पुत्र चित्रांगद यानें तीस पळवून