पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ रामायणनिरीक्षण. कंजांधीचें यूपकेतूशीं, कलावतीचें यूपकेतूशीं- याप्रमाणें सात नागकन्यांचीं लग्ने झालीं. चंद्रिकेचें अंगदाशीं, चंद्राननेचें चित्रकेतूशीं, चंचलेचें तक्षाशीं व अचलेचें सुबाहूशीं, याप्रमाणें पांच गंधवकन्यांचीं लग्ने झालीं; याप्रमाणें लग्नसमारंभ झाले. पुढें द्रविडदेशाधिपति कंवुकंठ हा शिवकांचींत आपल्या मुलीचें स्वयंवर करीत होता; त्या स्वयंवरास रामाकडील मंडळींस वोलाविले नव्हतें. हें नारदानें जाऊन अयोध्येत सांगितल्यानंतर यूपकेतूनें कांतिपुरीस जाऊन स्वयंवरांतून मदनसुंदरीचें हरण करून आणिलें ! कंबुकंठ ह्याचा पाठलाग करून आला असतां, यूपकेतूनें मदनसुंदरीच्या ह्मणण्यास मान देऊन त्याचा प्राण वांचविला. कुशाला चंपिकेच्या ठाई नऊ मुली झाल्या; व कुमुद्वती- च्या ठाईे आठ मुलगे झाले. त्यांतील वडील मुलाचें नांव अतिथि होय. असो. ( २६ ) रामसहस्रनामाचें वर्णन ( ७–१ मध्यें ) आहे. तसेंच सीतेकडून मूलकासुराचा वध राज्यकांडांत करविला आहे. मूलकासुर हा कुंभकर्णाचा पुत्र होता. नंतर राम दिग्विजयार्थ निघाले आहेत. सप्तद्वीपांतील सर्वहि राजांना त्यांनी जिंकले आहे. ( २७ ) एकेवेळीं एका ब्राह्मणाचा पांच वर्षाचा मुलगा मेला असें वर्णन आहे:- - अथैकदा तु साकेतवासिनो भूसुरस्य च । पंचत्वं पंचवर्षीयः पुत्रः प्राप्तः शिशुः प्रियः ॥ आ. रा. ७-१०-५० या मुलाचें व आणखी सहा जणांची प्रेतें रामानें उठविलीं व त्यांस जीवदान दिलें अशी कथा आहे. हे करण्याच्या पूर्वी त्यानें विंध्यपर्वताजवळ तप करीत असलेल्या शूद्रास ( शंबूकास ) देहांत