पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ९ वें १२५ ( २५) आनंदरामायणाचें विवाहकांड मोठें महत्वाचें आहे. इंदुमतीचा स्वयंवरप्रसंग ( कालिदासाचा ) व ह्यांतील भूरिकीर्ति- राजाच्या कन्येचा स्वयंवर यांतील राजांची बरींच नांवें सारखी आहेत. कालिदासांनीं ह्रीं नांवें यांतूनच मिळविल्याप्रमाणे दिसतात. भूरिकी- र्ति राजाच्या दोन कन्या चंपिका व सुमती नांवाच्या होत्या. त्या स्वयंवरास कर्णाटकाचा विजयराज, द्रविड देशचा कंवुकंठ, विदर्भ- देशचा अंगनाथ, मगधदेशचा परंतप, अवंतीचा उग्रबाहु, हैहयपत्त- नाचा प्रतीप, शूरसेनचा सुषेण, हरिद्वारचा नीपवंशांतील यज्ञकीर्ति, कलिंगदेशचा हेमांगद, नागपट्टणाचा ( उरगपट्टणाचा ) राजा पांड्य- वगैरे राजे या स्वयंवरास आले होते. नंदा नांवाची वृद्धदासी चंपिके - ला प्रत्येक राजा वर्णन करून सांगू लागली. तें वर्णन कालिदा- साच्या याच प्रसंगाच्या वर्णनाशीं ताडून पाहण्यासारखे आहे. चंपि- केनें शेवटीं कुशाच्या गळ्यांत स्वयंवराची माळ घातली. सुनंदा सुमतीला प्रत्येक राजाचें मग वर्णन सांगूं लागली; द्रविडदेशाचा राजा कंबुकंठ हा कांतिपुरींत (कांचींत ) राज्य करीत होता असें वर्णन आहे. तेथें वरदराज विष्णु व एकांबराव्हय शिव आहे असेंहि ह्मटलें आहे. कर्णाटकचा राजा विजय हा कृष्णेच्या कांठीं विजयपुरांत राज्य करीत आहे असे म्हटले आहे. सुमतीनें शेवटीं लवाच्या गळ्यांत माळ घातली. नंतर कुशलवांचे लग्नसमारंभ जाहले. भूरिकीर्ति राजा वट- पुरींत राज्य करीत असून ती ' पुरुषोत्तम राजधानी' समुद्रकांठावर होती असें म्हटले आहे. यावरून ही पूर्व समुद्रांच्या कांठची जगन्ना- थपुरीच की काय अशी शंका येते. ( २ ) पुढें कुशाचें दुसरें एक लग्न कुमुदनागाची कन्या कुमुद्रती इजशीं झालें, व तिच्या पोटींच अतिथि नांवाचा त्यास मुलगा झाला. त्या अतिथिपासूनच सूर्यवं- शाचा विस्तार झाला. पुढें कंजाननेचें लवाशीं, कंजाक्षीचें अंगदाशीं,