पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ रामायणनिरीक्षण. तिला २ । ३ महिन्यांनीं लवकुश हीं जुळीं मुले झाली. [ ५-४ ४]. [ २२ ] लोकांत प्रसिद्ध असलेलें बुधकौशिकविरचित रामर- 'क्षास्तोत्र या रामायणांत आहे ( ५-५ ). ( २३ ) रामांनी १०० अश्वमेधयज्ञ केले. शेवटच्या यज्ञाचे वेळी लवकुशांनीं यज्ञांत रामचरित्र गाऊन दाखविलें. त्याच वेळीं • त्यांनी रामाचा घोडा अडविला व त्यामुळे पितापुत्रांचीं युद्धे झालीं. पुढें वाल्मीकीनें दुसरे दिवशीं सकेंत ही मुलें कोण हें रामास निवेदन करून · सीता शुद्ध आहे, तिचा तूं अंगिकार कर ' ह्मणून सांगितलें. पुढें सीतेनें दिव्य करावें असें रामांनी सांगितल्यामुळे सीता ह्मणाली " मी जर रामाशिवाय दुसरा कोणी पुरुष मनांत आणिला असेन, तर पृथ्वी मला आपल्या विवरांत नेवो !' असें ह्मणतांच पृथ्वी दुभंगून तींतून एक सिंहासन वर आले व सीतेला त्यावर बसवून भूदेवी • तीस रसातली नेऊं लागली; पण रामांनी पुढे भूमीस शरांनी ताडन केल्यानंतर भूमीनें सीतेस परत रामाच्या स्वाधीन केलें. पुढें रामांनी · सीतेचरोवर १३००० वर्षे राज्य केलें ! ११००० वर्षे राज्य केलेला राम कल्पमेदाचा होय, असेही म्हटले आहे:-- रामेण सीतया सार्धं सहस्राणि त्रयोदश || वर्षाण्यत्र कृतं राज्यमस्मिन्कल्पे द्विजोत्तम ॥९४॥ एकादशसहस्राणि चैकादश दिनानि च ॥ सप्तद्वीपमहीपालो रामोऽभूत् कल्पभेदतः ॥ ९५ [ आ. रा. ५-९-९४ ते ९६ ( २४ ] लक्ष्मणास अंगद व चित्रकेतु, मांडवीस पुष्कर व तक्ष, च श्रुतकीर्तीस सुबाहु व यूपकेतु याप्रमाणें सीतेच्या भावजयांसहि मुलें झालीं. यांचे पुढें यथाकाळी रामांनी व्रतबंध केले. ( ५-९ )