पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ९ वें. १२३ ( १५) दंडकारण्यांत मुनीच्या आश्रमांत फिरतां फिरतां रामा- चीं ९ वर्षे गेलीं असें ( १ - ७ --- २७ ) म्हटले आहे. पुढें पंचवटींत ३॥ वर्षे गेलीं ( १--७-४०). निघाल्या पासून १२-१३ वर्षे गेलीं. नंतर रावणानें सीतेचें हरण केलें. ( १६ ) आश्विन शुद्ध १० श्रवणनक्षत्र विजय मुहूर्तावर (वि- जया दशमीच्या मुहूर्तावर ) राम लंकेवर चाल करण्यास निघाले ( १ - १० - १५ ) ( १७ ) सेतु बांधला तेव्हां रामनामांकित दगड समुद्रांत तरत होते असें वर्णन आहे [ १-१०-२०५ ]. ( १८ ) बिभीषणाची बायको सरमा व इंद्रजिताची सुलोचना ह्मणून यांत उल्लेख आलेला आहे. रावणाचे पातालांतील स्नेही ऐरावण व मैरावण लेकेस युद्धाची बातमी ऐकून आले व त्यांनी मुर्छित रामलक्ष्मणांस देवीस बळी देण्यास पाताळांत नेल्याची व त्यांस मारुतीनें सोडवून आणिल्याची [ लोकांत प्रचलित अशी ] कथा यांत आहे. ऐरावण मैरावण एक नागकन्या पकडून आणून तीस नित्य भोगीत असत; तिच्या माहितीनें रामलक्ष्मणांनीं तेथील राक्षसांस मा- रिलें. भुंग्यांनीं तिचा पलंग पोखरला होता. पलंगाला रामाचा भार सहन झाला तर राम तुझा स्वीकार करील म्हणून मारुति तिला म्ह- णाला होता. त्या नागकन्येनें केवळ रामानें आपणास स्वस्त्री करावें या अटीवरच ऐरावणमैरावणांच्या मरणाचें गुह्य सांगितलें होतें. ( १९ ) रघुनाथस्तवराज ४-१ मध्यें वर्णिला आहे. ( २० ) व्यास सत्यवतीसुत व रामचंद्र यांची गांठ कवींनीं. ( ४–७ मध्यें ) पाडिली आहे !!! ( २१ ) रामांनीं सीता ७ १८ महिन्यांची गरोदर असतां रज- काच्या अपवाद्भयानें वाल्मीकीच्या आश्रमाजवळ सोडिली. तेथें