पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२. रामायणनिरीक्षण. निघाली; हीच ती सीता होय. ( तेथें यज्ञार्थ क्षेत्राचें कर्षण करीत असता खुद्द जनकासच सीता क्षेत्रांत सांपडली, असे वर्णन नाहीं हें लक्षांत ठेवण्यासारखें शाहे ). ( १० ) जनकाच्या बायकोचें नांव येथें सुमेधा असें दिले आहे. ( ११ ) वृंदेच्या शापामुळे विष्णूला रामावतार कसा धारण करावा लागला याची या रामायणांत हकीकत आहे. (सारकांड, सर्ग ४, श्लोक ते ११३ ). ८१ ( १२ ) सीतेला ११ व्या वर्षी रजोदर्शन झालें असें १-५-५४ मध्ये म्हटले आहे:- मासैः षड्डिर्जनकजा लध्वी श्रीराघवाच्छुभा ॥ लग्ने ह्येकादशे वर्षे रजोयुक्ता बभूव ह ॥ ५४ ॥ विवाहानंतर बारावर्षे अयोध्येत श्रीराम सीतेला रमवीत होते असें म्हटले आहे. [ १–५-१३१ ] विवाहानंतरं रामः समा द्वादश सीतया || रमयामास साकेते महाक्रीडापुरःसरम् ॥ १३१ ॥ ( १३ ) रामाला वनवास केव्हां प्राप्त झाला हैं याप्रमाणे सांगि- तलें आहेः--[ १–६ - ७२ खं ७३ ] माघमासे सिते पक्षे पंचम्यां परमेऽहनि ॥ ७१ ।। प्राप्ते ह्यष्टादशे वर्षे राववाय महात्मने || आसीद्वनप्रयाणं हि .. .... [ ७३ ॥ राम व सीता लग्नाचे वेळीं ६ । ६ वर्षांचे होते असें रामायणाचें मत आहे; दोघांत अंतर सहा महिन्यांचें होतें. ....... .... .... .... ( १४ ) ईषिकास्त्रानें रामानें, सीतेचा आंगठा फोडणान्या ऐंद्र- काकाचा डोळा फोडल्याची कथा यांत आहे.