पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ९ व वाचनालय, १२१ ( ५ ) ताटिका राक्षसी सुंदाची कामिनी असून मारीच व सुबाहु हे तिचे पुत्र होत ह्मणून १-३-८ मध्ये म्हटले आहे. ( ६ ) ताटकी राक्षसी वाटेंत पांथस्थ लोकांना मारून खात असे. तिला एका बागानें वनौकस् मुनींच्या हितार्थ रामानें मारून टाकिलें. विश्वामित्राच्या आश्रमास जाऊन तेथील यज्ञघासक राक्षसहि मारून टाकिले. कवि झणतो:- —— प्रारंभं रणयज्ञस्य चकार रघुनंदनः । याप्रमाणे हा रामानें रणयज्ञाचा प्रारंभच केला. ( ७ ) मिथलेस सीतेचें स्वयंवर होतें व तेथें रावणही आला होता; तो धनुष्य उचलूं लागला तोंच तें त्याच्या छातीवर पडलें व तो मुतूं व हागूं लागला व त्यास मग रामानें सोडविलें वगैरे लोकांतील प्रचलित कथा (वाल्मीकि रामायणांत नसलेल्या ) या आनंद रामायणांत आहेत. वा. रा. मध्ये स्वयंवर असल्याबद्दल उल्लेखच नाहीं, हें जाणत्यांना माहीतच आहे. ( ८ ) अहल्या शिळारूप झाली होती अशी समज तेथें ( वा. रा. मध्यें नसलेली ) आढळते. अहल्येविषयींच्या वेगळाल्या कथां- विषयीं कवि अशी उपपत्ति देतोः -- नदीरूपा जनस्थानेऽहल्या गौतमशापतः । रामेण भ्रमतारण्ये स्वांघ्रि+पर्शात्समुद्धृता ॥ २१ ॥ कल्पभेदाद्वदंतीत्थं मुनयश्चापि केचन | नैकरूपास्ति सर्वेषु कल्पेषु रामसत्कथा ॥ २२ ॥ ( ९ ) सीता अयोनिजा असून, ती एका शेतकऱ्याकडून जमी- न नांगरीत असतां पेंटींत एका ब्राम्हणास मिळाली; ती पेटी द्रव्याची समजून ब्राह्मणानें जनक राजाकडे नेली. तेथें उघडून पाहतां मुलगी