पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० रामायणनिरीक्षण. ठरला असतां ब्रह्मदेवाला रावणानें प्रश्न केला की, माझें मरण कोणाकडून आहे ? तेव्हां त्यानें सांगितले कीं, कौसल्येच्या पोटीं दशरथाकडून साक्षात् विष्णु रामरूपानें अवतरणार आहे. तो तुझा नाश करील. तेव्हां रावण अयोध्येस जाऊन तेथें नौकेंत बसून जलक्रीडा करीत असले- ल्या दशरथास त्यानें नाव पालथी करून बुडविलें, व पुढें दशरथ व सुमंत्र हे नावेच्या एका तुकड्यावर बसून तरंगत तरंगत नदींतून समुद्रांत गेले. इकडे कोसलांत जाऊन कौसल्येस आणिले व तिला पेटींत घालून ति- मिंगिल माशाच्या स्वाधीन केले. पुढें तो मासा समुद्रांत इतर माशाबरोबर लढर्णे संपल्यानंतर ती पेटी गिळणार होता. ती त्याने एका बेटावर नेऊन कांहीं वेळ ठेविली ! याप्रकारें रावण आपल्या मनांत समजत होता कीं दशरथ व कौसल्या या दोघांचीहि आपण वाट लाविली, पण दशरथ तरंगत तरंगत समुद्रांत त्याच बेटावर येऊन लागला; त्यानें पेटी उघडून पाहिली तो आंत कौसल्या ! मग तेथल्या तेथें गांधर्व विधीनें विवाह उरकून घेतला. मग तिघेहि त्या पेटीत बसून त्यांनी द्वार लावून घेतलें ! इकडे ब्रह्मदेवाकडून ही बातमी रावणास कळतांच त्यानें येऊन पाहिलें तो खरेंच तिघे त्या पेटींत त्यास दिस- ले. पुढे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरूनच त्यानें ती पेटी अयोध्येस पोंचती केली ! याप्रमाणें दशरथ व कौसल्या यांचा विवाह घडून आला. ( २ ) सुमित्रा ही मगध देशाच्या राजाची मुलगी होती. ( ३ ) कैकयी ही केकय देशच्या अश्वपतीची मुलगी होती. ४ ) विष्णु रामदाशरथीच्या रूपानें चैत्र शुद्ध नवमीला मध्यान्हीं रवि असतां अवतरले असें १ - २-४ मध्यें म्हटले आहे. सुमित्रेच्या पोटीं लक्ष्मणरूपानें शेष अवतरला; व कैकेयीच्या पोटीं भरतशत्रुघ्न रूपानें शंख व चक्र ही जुळीं अवतरलीं असहि ह्मटलेले आहे.