पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मकरण ८ वें. Half ११३ लढत नाहीं. जै. अ. पर्वात समुहि लहून बेशुद्ध होतो; नंतर वरुणा- लयांतून आलेल्या वाल्मीकीच्या मध्यमेशीनें रामपक्षीयांस घोडा मिळतो व सैन्य उठून अयोध्येस जात, पण रामाश्वमेधांत प्रथमपासूनच वाल्मीकि हा अयोध्येत सरयूतीरावर अध्वर्यु होऊन बसलेला असल्या- मुळें सीतेलाच तेथें मध्यस्थी करून अश्वास मुक्त करावें लागले आहे. सीतेनें कृपेनें सोडलेला घोडा घेऊन शत्रुघ्नादि वीर परत अयोध्येस जातात; तेथें पुढें रामानें ‘हीं मुले आपल्या आश्रमांत कोण व कोठून आलीं' असें शरयूतीरावर वाल्मीकीस विचारिलें आहे. तेव्हां, वाल्मी कीनें ‘ह्रीं आपलींच मुलें आहेत' असे त्यांस सांगितलें, नंतर रामानें सीतेला व मुलांस आणण्यास लक्ष्मणास पाठविलें. प्रथम सीतेने फक्त मुर्लेच तेवढीं पाठविलीं; पण पुनः लक्ष्मण रामाकडून आलेला पाहून तीहि मग रामाजवळ गेली. या प्रमाणे रामाश्वमेधांत राम व सीता यांची; व राम व कुशलव यांची भेट घडविली आहे. ८ वरील दोन्ही हकीकतींत गंमत ही आहे कीं, यज्ञांत सीता आल्यानंतर ती शपथ घेऊन सर्वोसमक्ष भूमीच्या विवरांत गडप होऊन जात नाहीं; राम तिचा आनंदाने स्वीकार करून निर्विघ्नपणे यज्ञ करितात. पुढेंहि सीतेला भूमातेनें विवर देऊन तिचा अंगिकार केल्याबद्दल यांत - या दोन्हों ग्रंथांत-थोडीहि सूचना नाहीं, ही मोठी चमत्कारिक गोष्ट होय!