पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ रामायणनिरीक्षण. हाही एक प्रश्न आहे. तेव्हां कुशानें शत्रुघ्नास बेशुद्ध करून, त्याच्या रथावरील लवास शुद्धीवर आणिलें हेंच सयुक्तिक दिसतें. ( ९ ) कुशाने शत्रुघ्न व सुरथ यांस बेशुद्ध केलें; तसेंच हनुमान् व सुग्रीव यांसहि बेशुद्ध केलें. लवानेंहि अनेक राजे जिंकिले. दोघां- नींही मिळून सैन्यांत कल्लोळ उडवून दिला. नंतर कांहीं वीरांचीं आभरणें व मुकूट घेऊन व हनुमान् व सुग्रीव यांस धरून ते दोघे मातेजवळ गेले. सीतेने त्या दोन्ही वानरांस सोडून देण्यास सांगि- तलें. सीतेला मुलांनी सर्व हकीकत सांगितली तेव्हां हा आपल्या नव- न्याचाच हय आहे असे तिला कळून चुकले. ( १० ) सीतेने मुलांस सांगितलें कीं हा तुमच्या पित्याचा घोडा असून तुझीं पित्याचें सैन्य मारिलें. मुलें ह्मणालीं:- क्षात्रधर्मेण तं भूपं जितवंतौ वलान्वित || नास्माकं अनयो भावि क्षात्रधर्मण युध्यताम् ॥ ७१ ॥ वाल्मीकिना पुरा प्रोक्तं अस्माकं पठतां पुरः । • दुप्यतेन समं युद्धं भरतेन कृतं पुरा || ७२ || कण्वस्याश्रमके वाहं धृत्वा यागक्रियोचितम् । तस्मात्सुतः स्वपित्रा च युध्येत् भ्रात्रापि चानुजः ॥७३॥ गुरुणा चापि शिष्येण तस्मान्नो पापसंभवः । त्वदाज्ञातोऽधुना चावां दास्यावो यमुत्तमम् ॥ ७४ ॥ नंतर मातेच्या आज्ञेनें कुशलवांनीं अश्व सोडून दिला, हनुमान् सुग्रकि यांस सोडून दिलें व आभरणें परत दिली. पुढे सीतेच्या पातिव्रत्यानें सर्व सैन्य जिवंत झालें असें ६४ व्या अध्यायांत वर्णन आहे. - ( ११ ) जै. अ, पर्वीत व रामाश्वमेधांत मुख्य फरक हा आहे कीं, रामाश्वमेधपर्वीत राम प्रत्यक्ष रणांगणावर येऊन आपल्या मुलांशीं