पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ वें १११ [ ५ ] दोन्हीं ठाई लवानें अश्व सोडवू पाहणाऱ्या लोकांचे हात तोडून टाकिले आहेत. साठाव्या अध्यायापासून पुढे लवाशीं शत्रुघ्नपक्षाकडील सैन्याचें युद्ध झालेली हकीकत आहे. तींतील फरक खाली देतोंच ( ६ ) यथें लवानें प्रथमच कालजितास मारिलें आहे. तसेंच, नंतर भरतपुत्र पुष्कलास लवानें बेशुद्ध केले आहे; लवानें मारुतीसहि कपटमूर्च्छा ' घ्यावयास लाविलें [ ६१. ६१ ]. लवानें शत्रुघ्ना- सहि मूर्छित केलें; नंतर सुरथादि राजे त्यावर चाल करून गेले; त्या सर्वोस लवानें पळवून लाविलें. 6 ( ७ ) जै. अ. पर्वातल्याप्रमाणेच येथेंहि शत्रुघ्नाच्या बाणानेंच लवास मूर्छा आली. [ ६१ अध्याय ]. इतक्यांत ही बातमी सीतेला कळविल्यानंतर ती शोक करूं लागली. जै. अ. पर्वत कुश हा समिधा व कुश आणावयास गेला होता; पण रामाश्वमेधांत [ ६३- १९ ] तो उज्जयिनीच्या महाकालास गेला होता, तो परत आला. ( ८ ) जै. अ. पर्वीत, लवास मूर्छित असतांना शत्रुनानें आपल्या रथांत वाहून नेलें होतें; कुशाने शत्रुघ्नास जिंकून त्यास वेशुद्ध केल्या- नंतर लव शत्रुघ्नाच्या रथावर कुश गेला असतां, शुद्धीवर आला आहे. पण रामाश्वमेधांत कुश आल्याबरोबर लवाने काय केलें याब- द्दल असा श्लोक आहे:- - लवो महाबलं दृष्ट्वा कुशं भ्रातरमागतम् । रथादुन्मुच्य आत्मानं युद्धाय स विनिर्गतः ॥ म्हणजे, [ ६३. ४६ ] कुश युद्धांत येण्यापूर्वीच लव शुद्धीवर आला असे यांत सिद्ध होतें; शिवाय, रथांतून सुटून जाण्याजोगें शत्रुघ्न यास ठेवील तरी कसा