पान:रामायणनिरीक्षण.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ वें १०९ वाटलें व नंतर रामाचें व कुशलवांचें युद्ध सुरू झाले. त्यांत राम शेवटीं मूर्छित होऊन पडला ! ! ! नंतर, मुलांनीं रामलक्ष्मणांच्या अं- गावरील दागिने बरोबर घेतले. हनुमाम् व जांबवान् यांनीं मूर्छा आल्याचीं सोंगे घेतलीं ! “ कपटमूर्छितो " ( ३६. ७१ ). नंतर हनुमान् व जांबवान् यांसहि त्यांनी सीतेजवळ पकडून नेलें. तेव्हां सीतेनें त्यांस सोडून देण्यास सांगितलें ! त्यामुळें, लवाने त्यांस रणांग- णांत सोडून दिलें. ( ३६. ७५). इतक्यांत वाल्मीकि वरुणालयांतून आश्रमांत आले; तेव्हां मुलांनी त्यांस सर्व हकीकत सांगितली. नंतर वाल्मीकीनें पाण्यानें शिंपडून सर्वोस उठविलें व रामास ते म्हणाले कीं:- तव पुत्रौ महाराज ! गृह्यतां रघुनंदन । मन्यसे यदि सीतां च निर्दोषां नेतुमर्हसि ॥ जै, अ. पर्व, ३६, ७९ नंतर राम मनांत आश्चर्य मानून घोडा घेऊन नगरीस गेले, पुढें त्यांनी मोठा यज्ञ केला ( ८० ) नंतर वाल्मीकीनें सीतेस व पुत्रांस त्यांजवळ नेऊन पोंचविलें:- वाल्मीकिः कथयामास रामाय किल बालकौ । सीतां नीतां पुत्रयुतां संस्थाप्य रघुसंनिधौ ॥ ८१ || रामः पुत्रयुतो जात: सीतया सहितः स्थितः ॥ याप्रमाणें रामाची आणि सीतेची व मुलांची गांठ पडली. ही जैमिनी अश्वमेधाची हकीकत होय ! २ रामाश्वमेधपर्वातील हकीकत. वरील जैमिनिअश्वमेधपर्वातील हकीकतींत व रामाश्वमेधप- पर्वतील हकीकतींत खालील मुख्य फरक आहेत:-