पान:रामायणनिरीक्षण.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ रामायणनिरीक्षण. कुमकेसाठीं रामानें लक्ष्मणास मोठ्या सैन्यानिशीं तेथें पाठवून दिले. लक्ष्म- णाचा सेनापती कालाजित् नामें करून होता, [ अ. ३२). हें सैन्य तेथें येऊन धडकलें? तेव्हां लवकुशांनीं त्या सैन्याचा नाश करण्याचा निश्चय करून सेनेंत प्रवेश केला. लवणाचा मामा रुधिराक्षही लक्ष्म- णाच्या पक्षानें लढावयास आला होता. या सर्वांची लवकुशांनीं दुर्दशा उडवून दिली. मदिराक्षास लवानें ठार मारले. पुष्कळ सैन्याचा वध केला. लवानें आपणा सभोंवतीं वेढा दिलेल्या सैन्याचा चुराडा करून सोडिला. ( अ. ३३. ) लक्ष्मणावर कुश चाल करून गेला. इतक्यांत काल- जित् मध्यें आला, तेव्हां त्यास कुशानें ठार केले. लक्ष्मणाला देखील कुशानें भूमीवर पाडिलें. नंतर सर्व सैन्याचा संहार करून ते दोघे चीर निर्भय होऊन आश्रमाकडे पाहत राहिले ( अ. ३४ ). नंतर रामानें भरतास यांच्या कुमकेस पाठविलें. त्याच्या बरोबर हनुमान् जांबवान् वगैरे वानर वीरहि पाठविले. ते रणभूमीवर येऊन • दाखल झाले. हनुमानानें शत्रुघ्न व लक्ष्मण बेशुद्ध पडले होते त्यांस भरताजवळ उचलून नेलें. इतक्यांत कुश तेथें आला; लवही आला. त्यानीं पुनः कल्लोळ उडवून दिला. भरतहि पुढे मूर्छित होऊन पडला !! हनुमंताचीही तीच अवस्था झाली ! ! ! नंतर सुग्रीवादि मंडळी बरोबर घेऊन राम तेथें आले ! बिभी- घणहि बरोबर होताच ! रामानें ' तुम्ही कोण, कोठील' वगैरे प्रश्न केले. पण ' लढायीस बाकीचे प्रश्न घेऊन काय करावयाचे आहेत? ' असे मुलांनी उत्तर दिलें. तेव्हां, रामानें 'मीं तुमच्याशीं युद्ध करीत नाहीं, ' म्हणून आश्वासन दिल्यानंतर मुलांनी आपण सीतेचीं मुले आहोंत म्हणून सांगितलें. तेव्हां, हीं आपलीच मुले आ- हेत अर्से ओळखूनहि, रामास क्षात्रधर्माप्रमाणे युद्ध करणे जरूर