पान:रामायणनिरीक्षण.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ वें. १०७ तो घोडा तेथें पकडून ठेविला; त्याला आपल्या उत्तरीयानें कदलीच्या झाडास बांधून ठेविलें. मुनिपुत्रांनीं पुष्कळ सांगून पाहिले पण तें तो ऐकेना. इतक्यांत सैनिक येऊन घोडा सोडवून घेऊन जाऊं लागले. तेव्हां लवानें आपला विलक्षण प्रभाव दाखविला; त्यानें अश्व सोड- बिण्यास आलेल्या लोकांचे हातच तोडून टाकिले ! नंतर युद्धच सुरू होऊन त्यांत लवानें अत्यंत पराक्रम गाजवून शत्रुनाच्या सैन्यांत कल्लोळ उडवून दिला. यामुळे शत्रुघ्न चवताळून लवाच्या अंगावर गेला. नंतर लव व शत्रुघ्न यांचें कांहीं काळपर्यंत युद्ध होऊन, शेव शत्रुघ्नाच्या एका बाणानें लव निश्चेष्ट होऊन पडला. नंतर त्यास शत्रुघ्नानें आपल्या रथांत घालून नेलें. अश्व मोकळा करण्यांत आला. ही बातमी मुनिपुत्रांनीं सीतेस सांगितली. सीतेनें कुश परत येईपर्यंत लव जीवंत राहू दे, म्हणून देवाची अनन्यभावें प्रार्थना केली. तेव्ह आश्रमांत वाल्मीकि किंवा कुश हे दोघेहि नव्हते. इतक्यांत समा व कुश घेऊन कुश घरीं परत आला. तेव्हां सीतेनें त्यास युद्धास सज्ज करून लवास ( व अश्वास ) सोडवून आणण्यास पाठविलें. कुश रणांगणावर येऊन त्यानें सैन्यास लढाईस आव्हान केलें. तेव्हां शत्रुघ्नाने आपल्या सेनापतीस त्याजवर पाठीवलें; पण कुशाने त्यास यमसदनास पाठविलें, तेव्हां त्या सेनापतीचा नग नामक बंधु त्यावर चाल करून आला; त्याचीहि कुशानें तीच वाट लाविली. नंतर कुशानें त्या सैन्यां- त कल्लोळ उडवून दिला. पुढें स्वतः शत्रुनच कुशावर चाल करून आला; तेव्हां शत्रुघ्नास रथावर त्यानें बेशुद्ध पाडिलें. बाकीच्या सैन्याचाहि धुव्वा उडवून दिला. कुशानें जाऊन लवास मिठी मारिली; इतक्यांत लवहि शु- द्धीवर आला. लवानें पुनः घोडा बांधून ठेविला. इकडे शत्रुघ्नाच्या पक्षांतील लोकांनीं अयोध्येस जाऊन हें वर्तमान रामास कळविलें. तेव्हां शत्रुघ्नाच्या