पान:रामायणनिरीक्षण.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ रामायणनिरीक्षण. कर्तव्य आहे. प्रथम जैमिनी अश्वमेघांतील हकीकती विषयीं देऊन, नंतर प्रस्तुत ग्रंथांतील हकीकतीशीं ती कितपत जुळते हैं आपण पाहूं. ( १ ) जैमिनि अश्वमेधपर्वातील हककित. जैमिनी अश्वमेधाच्या अध्याय २५ ते ३७ पर्यंत रामाविषयींची कथा आहे. पैकीं रामाचा अश्वमेध सुरू होऊन तो घोडा लवानें वाल्मीकीच्या आश्रमांत पकडून ठेवीपर्यंतची हकीकत मी दुसरीकडे दिली आहे. लवानें रामाचा घोडा पकडून ठेविल्यानंतर पुढे काय झालें हें येथें पाहावयाचें आहे. अ. २९ श्लोक ३९ पासून रामाश्व- मेधाची हकीकत आहे. राम अयोध्येत राज्य करीत असतां ब्रह्महत्येनें पीडित झाल्यामुळे त्यास चैन पडेना; ह्मणून त्यानें अश्वमेधयज्ञ करण्याचा निश्चय केला ( २९-४० ) व अश्वमेधाची तयारी केली. सीतेची सौवर्णी प्रतिमा केली. राम दीक्षित झाला. अश्वाच्या कपा- ळावर सोन्याचा पत्रा बांधून त्यावर असे लिहिलें:- एकवीराऽद्य कौसल्या तस्याः पुत्रो महाबलः । - तेन मुक्तं हरिवरं गृहातु बलवान्नरः ॥ २९-५७ ॥ शत्रुघ्नास अश्वरक्षणास पाठविलें. तो अनेक नगरांस व उपवनांस गेला. शत्रुघ्नानें पुष्कळ बलवान् राजांस जिंकून तो घोडा मुक्त केला ( २९ - ६२ ). नंतर तो घोडा वाल्मीकीच्या आश्रमास आला. त्या वेळीं वाल्मीकि वरुणाच्या यज्ञासाठीं रसातळास गेला होता. लवानें १ न शर्म लेभे रामोऽसौ व्रम्हहत्याभिपीडितः । अश्वमेध ऋतुवरं कर्तुकामाप्यभूद्रधुः ॥ २९-४० ॥ २ यावरून बाकीची हकीकत मुद्दाम जैमिनीने येथें अप्रस्तुत म्हणून दिली नाहीं असे कळून येईल.