पान:रामायणनिरीक्षण.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ वें, १०५ ( ११ ) नंतर घोडा शौनकाच्या आश्रमास व हिमालयाकडील अनेक ठिकाणी फिरला. ( १२ ) नंतर तो कुंडलपुरास आला; तेथें सुरथ राजा राज्य करीत असे. त्याचा पुत्र चंपक यानें घोड्यास अडकवून ठेविलें. तेव्हां महयुद्ध होऊन प्रत्यक्ष रामास येऊन, तो घोडा सोडवावा लागला. ( १३ ) नंतर घोडा शेवटीं वाल्मकिच्यिा आश्रमास गेला. तेथील हकीकतीचा सविस्तर विचार आतां आपण करूं [ घोडा फिरला ती ठिकाणे पाहिलीं असतां, बहुतेक उत्तर हिंदुस्थानांत आहेत; व ती इतकीं प्राचीन शहरें दिसतात कीं, त्यांचा २-३ शि- चाय भारतांत कोठें मागमूसहि नाहीं. रामायण काळीं आर्यांची वस्ती होती, त्याच्या बाहेरचीं ह्रीं शहरें नाहींत. यावरून ही अश्वमेधाची हकीकत ऐतिहासिक परंपरेवरूनच उत्पन्न झाली असली पाहिजे हैं उघड होतें. अलीकडेच कोणीतरी ही हकीकत उठविली असती, तर अलीकडच्या शहरांचा त्यांत उल्लेख आला असता; व घोडा चारी दिशेस ( रघूच्या रघुवंशांतील दिग्विजयाप्रमाणें ) फिरून विज- यी होऊन आला असता; पण वरील वर्णन तसें दिसत नाहीं; यावरून ही हकीकत ऐतिहासिक असावी असे वाटें. ] लवकुशाख्यान. येथून पुढच्या हकीकतीस दोन ग्रंथ प्रमाणभूत आढळतात; एक वरील रामाश्वमेधपर्व; दुसरें जैमिनीअश्वमेधपर्व. या दोन्हींच्या कतींत थोडासा फरकहि पण आढळतो. म्हणून याचा विशेष विचार हकी- २ है कोणते शहर हे कळत नाहीं.