पान:रामायणनिरीक्षण.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ रामायणनिरीक्षण. राज्य करीत होता; त्याचा पुत्र दमन नांवें होता; त्यानें घोडा अडक- वून ठेविला. तेव्हां दमनाचें व पुष्कलाचें मोठें युद्ध होऊन शेवटीं त्यांत पुष्कल विजयी झाला. तेव्हां सुबाहूचे डोळे उघडून त्यानें घोडा सोडून दिला व आपण घोड्यामागें रक्षक होऊन गेला; आपली सर्व संपत्ति त्यानें शत्रुघ्नाच्या चरणी अर्पण केली. [ ६ ] नंतर घोडा फिरत फिरत तेजः पुरास गेला; तेथें ऋतंभर राजाचा पुत्र सत्यवान् हा राज्य करीत होता. ( ७ ) नंतर घोडा तेथून निघून चालला असतां रावणाचा मित्र जो विद्युन्माली नामक राक्षस त्यानें तो घोडा उचलून आपल्या विमानांत बांधून नेला; तेव्हां, मोठें युद्ध होऊन शत्रुभानें तें विमान खाली पाडून विद्युन्मालीस ठार मारलें. ( ८ ) नंतर घोडा रेवानदीच्या कांठच्या आरण्यक मुनीच्या आश्रमास गेला. या आरण्यक मुनीस लोमशानें हा घोडा त्याचे आश्रमास येण्यापूर्वीच रामाचें संक्षिप्त चरित्र सांगून ठेविलें होतें. [ अ. ३६ ). हे लोमशाचें संक्षिप्त रामचरित्र बऱ्याच दृष्टीनें मह- त्त्वाचें आहे. ( तें मीं दुसरीकडे समग्र दिले आहे. ) आरण्यक- मुनीला रामास पाहण्याची इच्छा झाल्यामुळे त्यांस अयोध्येस पाठवि- ण्यांत आलें. ( ९ ) नंतर घोडा रेवाचलांतील योगिनीच्या भवनास गेला; तिनें शत्रुघ्नास एक अस्त्र देऊन पाठविलें. ( १० ) नंतर घोडा देवपुरास गेला, तेथें वीरमणी राजा राज्य करीत होता; त्याचा मुलगा रुक्मांगद होय. येथें महयुद्ध झालें. येथें प्रत्यक्ष रामास येऊन घोडा सोडवावा लागला. १ है बंगाल्यांतील सध्याचें तेजपुर की काय हे कळत नाहीं.