पान:रामायणनिरीक्षण.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ वें. घोडा सोडण्यांत आला. . त्या घोड्याबरोबर शत्रुघ्न, पुष्कल ( भरतपुत्र ), हनुमान्, जांब- वान् इत्यादि वीर, त्याच्या रक्षणासाठी दिले होते. तो घोडा प्रथम जरा पूर्वेस वळला; नंतर पांचाल, कुरु, उत्तरकुरु, दशार्ण व विशाल वगैरे प्रदेशांतून तो फिरला. त्याचा तपशीलच पुढे दिल्याप्रमाणेंः--- ( १ ) घोडा प्रथम अहिच्छत्रा नगरींत गेला; तेथें त्यावेळीं सुमद राजा राज्य करीत होता. त्यानें रामाचा अश्वमेधाचा घोडा आलेला आहे अर्से ऐकल्याबरोबर आपलें राज्य वगैरे शत्रुघ्नास समर्प- ण करून आपण स्वतः अश्वरक्षणास निघाला. १०३ ( २ ) नंतर पयोष्णी तीरावरील च्यवन ऋषीच्या आश्रमास घोडा गेला. तेथें च्यवनाची कथा शत्रुघ्नानें ऐकिली. च्यवनाने रामाचें दर्शन घेण्याची इच्छा दर्शविल्य बरोबर शत्रुघ्नानें रामाकडे त्यांस हनुमानाबरोबर पाठवून दिलें. ( ३ ) नंतर घोडा रत्नांतदपुरास गेला; तेथें विमल नामक राजा राज्य करीत होता. ( ४ ) पुढें तो गंगासागरसंगमाजवळील नीलपर्वताजवळ गेला. [ ५ ) तेथून निघून तो चक्रपुरीस आला, तेथें सुबाडु राजा १ अहिच्छत्रा ही पांचालदेशाची फार प्राचनि अशी राजधानी होय. २ पयोष्णी म्हणजे हल्लांची वन्हऱ्हाडांतील पूर्णा नदी होय ! ३ है हल्लीच रत्नपुरच (नर्मदेच्या कांठचें) की काय, हे कळण्यास दुसरे कांहीं साधन नाहीं; हैहयराजे फार प्राचीन काळापासून या भागांत येऊन राहिले होते. ४ आतां घोडा बंगालच्या भागांत आल्याप्रमाणे वाटते. चक्रपुरी म्हणजे ची कोणती पुरी है कळत नाहीं.