पान:रामायणनिरीक्षण.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ रामायणनिरीक्षण, ळचें काय वर्णन करावें ? रामानें गुरूंस वगैरे नमस्कार करून सर्वां- बरोबर स्वारी अयोध्येस निघाली. भरतानें आधींच आपला एक मंत्री पाठवून राम परत आल्याची बातमी शहरभर प्रसिद्ध करून ठेविली होती. त्यामुळे शहरांत जिकडे तिकडे आनंद व शोभा व शृंगार या शिवाय कांहीं एक दिसत नव्हतें, अशा थाटांत व आनंदांत स्वारी अयोध्येत शिरली ! नंतर राम व लक्ष्मण सीतेबरोबर आपल्या आयांस भेटले; प्रथम कैकेयीस, नंतर सुमित्रेस व नंतर कौसल्येस. कौसल्येस आपला पुत्र १४ वर्षांनंतर परत आलेला पाहून किती आनंद झाला असेल बरें ? नंतर, सुमुहूर्तावर रामास राज्याभिषेक झाला. याप्रमाणे एके दिवशीं दरबारांत राम बसले असतां, अगस्त्य ऋषींनी येऊन रामाचें, रावणास मारिल्याबद्दल अभिनंदन केले. पुढे अगस्त्य - नें रामास रावणाविषयीं पूर्वांची हकीकत सांगितली आहे. ( ती येथे देण्याचें कारण दिसत नाहीं ). राम याप्रकारें राज्य करीत असतां ११००० वर्षे गेलीं असें ( ५-४५ मध्ये ) म्हटले आहे. पुढें सीतेचा लक्ष्मणाकडून वनांत त्याग करविल्याची हकीकत आहे. सीतेला वनांत सोडल्यानंतर अगस्त्यांनी जेव्हां रावणाची हफकित रामास सांगितली, तेव्हां पुलस्त्यकुलांत उत्पन्न झालेल्यास - ब्राह्मणास - आपण मारिलें याबद्दल रामास विषाद उत्पन्न होऊन त्यानें याबद्दल अश्वमेधयज्ञ करण्याचे ठरविलें. अश्वमेधाची सर्व तयारी लगेच करण्यांत आली. राम सरयूकांठीं दीक्षित झाले, राम ' स्वर्णपत्नीसमन्वित ' होते ( १०.३२ ]; कारण, त्यांनी आधींच सीतेचा त्याग केला होता. या अश्वमेधयज्ञांत वाल्मीकि ऋषि आले असून त्यांजकडे अध्वर्यूचें काम होतें ( १० - ३६ ) याप्रमाणे सर्व तयारी झाल्यानंतर, अश्वमेधाचा