पान:रामायणनिरीक्षण.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ वें. १०१ तेव्हां वाल्मीकीनें कांहीं तरी हेतूनें- मुद्दाम - ही रामाश्वमे- धाची हकीकत आपल्या रामायणांतून गाळलेली आहे, अशी एक प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येतें. बाकीच्या ग्रंथका- रांना ही हकीकत मग कोठून मिळाली, हा एक मोठा प्रश्नच आहे; तथापि, परंपरेनें ही हकीकत आर्थात राहिली असावी असेंहि वाटतें. आतां आपण पद्मपुराणांतील रामाश्वमेधपर्वावरून खालील हकीकत अवलोकन करूं:-

  • प्रारंभींच वात्स्यायनमुाने शेपास म्हणतो कीं: -

तस्य वीरस्य रामस्य हयमेधकथा श्रुता । संक्षेपतो मया त्वत्तः तामिच्छामि सविस्तराम् ॥ ६॥ रामाचें चरित्र ‘ शतकोटिप्रविस्तर ' असून ज्याला जसे वाटतें तर्से तो याचें वर्णन करितो, अशी एक यांत उक्ति आहे:- चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । येषां वै यादृशी बुद्धिः ते वदंत्येव तादृशम् ॥ ( १-१३ ) इतकी प्रस्तावना झाल्यानंतर कथेला प्रारंभ झालेला आहे. रामानें लंकेंत जाऊन रावणास मारिलें; बिभीषणास राज्याभिषिक्त करून राम सीतेसह पुष्पक विमानांत बसून अयोध्येकडे निघाले. नंदिग्रामाजवळ रामानें भरतास आपण आल्याची सुवार्ता कळविण्यास, हनुमानास पाठविलें. भरतानें लगेच वसिष्ठादि मंत्रिमंडळासह रामाच्या दर्शनास्तव प्रस्थान केले आहे; वसिष्ठादि गुरु येत आहेत हे पाहून राम विमानां- तून खाली उतरले. भरत व राम यांची भेट एकदांची झाली ! त्यावे -

  • यावरून या पर्वाच्या पूर्वी संक्षेपानें ही हकीकत शेषाने वात्स्यायनास सां-

गितली होती असे वाटते.