पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० रामायणनिरीक्षण, प्रकरण ८ वें. रामाचा अश्वमेधयज्ञ. रामाच्या अश्वमेधाची विस्तृत हकीकत वाल्मीकि रामायणांत नाहीं, ही गोष्ट खरी आहे; तथापि, सातव्या शतकांतील उत्तररामचरि- त्रांत जर रामाश्वमेधाचा उल्लेख आहे, तर ती गोष्ट बरीच प्राचीन असली पाहिजे हें उघड होतें. तेव्हां, वाल्मीकीच्या ग्रंथांत नाहीं तर नाहीं, दुसऱ्या कोठें तरी या रामाश्वमेधाची हकीकत मिळते कीं काय, हें आपण पाहूं:-


( १ ) पद्मपुराणाच्या पाताळखंडांत रामाश्वमेधपर्व म्हणून एक स्वतंत्र पर्वच आहे. त्यांत ६८ अध्याय व ४३०४ श्लोक आहेत; ते पाताळखंडाच्या प्रारंभीच आहेत. त्यांत रावणाला मारिल्यापासून अश्वमेधाच्या अखेरपर्यंतची सर्व हकीकत आहे. या पर्वाच्या कर्त्यास वाल्मीकि रामायण माहित होतें, हें दुसरीकडे मीं दाखविलेंच आहे. ( २ ) तसेंच, जैमिनीयाश्वमेध पर्वत या रामाश्वमेधापैकी लव- कुशाख्यान तेवढे आहे; तेथें सविस्तर हकीकत सांगण्याचे कारणच नव्हतें. पितापुत्रांचें युद्ध पूर्वी फोठें आलें असल्यास त्याचा दाखला जनमेजयास पाहिजे होता; व लवकुश हे रामाबरोबर अश्वमेधाच्या वेळीं लढले, एवढीच हकीकत जैमिनीने त्यास सांगितली आहे; शेवटी त्यांत असेंहि स्पष्ट म्हटले आहे कीं:- -- नाख्यातवानिदं युद्धं वाल्मीकिः पितृपुत्रयोः | यदि आख्यास्यद् अमजिप्यत् लोकोऽयं करुणार्णवे || जै. अ. पर्व, ( ३६-८४ )