पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. ९९ ( ६ ) स्कंद पुराणाच्या काशीखंडांत करालकेतु याचा पुत्र कंका- लकेतु राक्षस याची हकीकत आहे. यानें एकदां गंधमादन पर्वता- तावरील एका गंधर्वाची मलयगंधिनी नामक कन्या उचलून मुका- ट्यानें पातालास गमन केलें. कंकालकेतु राक्षस पाताळांत चंपावती नगरांत राहत असे, नारदऋषि एके वेळीं पाताळांतील भोगावतींत स्नान करून हाटकेश्वराची पूजा करीत होते. त्यांना मलयगंधिनीस राक्षसानें पळवून आणिलेलें वर्तमान समजलें. मलयगंधिनीशीं असून त्या राक्षसानें लग्न लाविलें नव्हतें. इतक्यांत नारदानें मित्रजित नामक इकडील राजास ही हकीकत कळवून, त्याजकडून चंपावती नगरीतून मलयगंधिनीची सुटका करविली. मलयगंधिनीनें पुढे मित्रजिताशींच, हा उपकार स्मरून, लग्न लाविले. ( काशीखंडकथारस, २२२.) वरील गोष्टीवरूनहि राक्षसांचें मूळस्थान पाताळच होय, हें सिद्ध होते. ( ७ ) तसेच, स्कंदानें तारकासुराचा वध केल्यानंतर, बाकीचे दैत्य ( राक्षस ) पाताळांत पळून गेले. तारकासुराचा शिरच्छेद करून स्कंदानें (कार्तिकस्वामीनें ) बाणांनीं, सप्तपाताळांत जाऊन अकरा कोटि असुरांची ( राक्षसांचीं ) कुळें संहारून टाकिलीं, असें वरील काशीखंडांतच वर्णन आहे [ पृ. १०९ ]. ( ८) आनंदरामायणांत ( १-९-९६६ मध्ये ) मारुति रावणास म्हणत आहे की:- - जीवन्न रामेण विमोक्ष्यसे त्वं । गुप्तः सुरेंद्रैरपि शंकरेण ॥ न देवराजांकगतो न मृत्योः । पाताललोकानपि संप्रविष्टः ।। आतां हैं रसातल, पाताल ऊर्फ सुतल म्हणजे सध्यांचें अमे- रिका खंडच असावें, असें मीं दुसरीकडे एका परिशिष्टांत दाखविलें आहे. तें परिशिष्ट वाचकांनी अवश्य पाहावें.