पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. सीतेला रावणानें नेलेलें जटायूकडून रामलक्ष्मणांस कळलें होतें; पण हा रावण कोठें राहतो, हें मात्र त्यांस कळले नव्हतें. अशा प्रसंगींचें वरील वाक्य, कवीनें लक्ष्मणाच्या तोंडी घातले आहे. कवीस राक्षस मूळचे कोठील व ते रामाच्या वेळी लंकेंत कोठून आले होते, हैं माहीत होतें. 'लकेंत जरी रावण मिळाला नाहीं - जरी तो आमच्या भयानें लंका सोडून पाताळास ( म्हणजे आपल्या मूळस्थानास ) जाईल - तरी मीं त्यास ठार करीन !' असें कवीला बदवावयाचें आहे. कवीचा अर्थ असाच होता, याबद्दल पुढचेंच वाक्य साक्षिभूत आहे. रावणास दै समजून, ‘ तो जरी दितीच्या गर्भात शिरेल तरी, तेथून देखील त्यास ओढून आणूं ' असें कवीनें बदविलें आहे. ज्याप्रमाणें दितीचा गर्भ हा रावणाचें मूळस्थान होय, तसेंच पाताळ- हि सर्व राक्षसांचें मूळस्थान होय, असा कवीचा आशय स्पष्ट दिसतो. ( ५ ) हनुमानाटकांत राम रावणास असा निरोप पाठवीत आहे:- तद्वाच्यः स दशाननो मम गिरा; दत्ता द्विजेभ्यो मही । तुभ्यं ब्रहि, रसातलं; बलभिदे निर्जित्य किं दीयताम् ? ॥ ( १४ - २ ) - यांत, ‘ब्रिजांना ' म्हणजे आर्य तापस व मुनि यांस ' मही ' म्हणजे हिंदुस्थान दिलेलें आहे, व तुला ( म्हणजे रावणाला ) रसा- तल दिलेले आहे; तें तूं सोडून आर्यांना छळण्यास आलेला आहेस; तेव्हां, बोल ! तें रसातल तरी तुझें तुला राहावें अशी इच्छा आहे कीं, तेंहि आम्हीं जिंकून आर्यांचा जो देव इंद्र त्यांस देऊन टाकावें? असा रामाचा रावणास प्रश्न आहे. यावरून राक्षसांचे मूळस्थान पाताळ ऊर्फ रसातळच असून, तेथून ते इकडे लंकेत आले, अशीच या नाटककर्त्यांची समजून होती हें कळून येतें; व हाच सिद्धांत मान्य करणें जरूर दिसतें. ९८