पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. ९५ नायक [ हा आर्याचा शत्रु असल्यामुळे त्यास आर्यांनीं वैदिक ‘वृत्र' हें नांव दिलें असावें ] हिंदुस्थानाजवळील एकाद्या बेटांत राहून येथील ऋषींव तापसांस त्रास देऊं लागल्यामुळे एका आर्य सेनानायकानें [ रामाच्याहि पूर्वी ] त्याच्या समुद्रांतील वसाहतीवर हल्ला करून त्यास मारून टाकिलें; व त्याच्या मंडळीला स्वदेशाचा रस्ता दाखविला. असो:- - वृत्र याप्रकारें इंद्राकडून मारला गेल्यानंतर वृत्राची सेना ही हकीकत बळस कळविण्यासाठीं पाताळास निघून गेली:- एतस्मिन्नंतरे दैत्याः पातालवासिनं बालम् । शसंसुः सर्वं यद्वृत्तं देवेंद्रस्य चिकीर्षितम् || आपल्या पक्षाचा पराभव झालेला ऐकून बलि मोठ्या सैन्यानिशीं इकडे आला. त्यास भिऊन इंद्र आपले शहर सोडून पळून गेला. पुढें बलि हा बहुधा बंगाल्यांत आपलें ठाणे देऊन बसला. त्यांची वसाहत तर समुद्रांतील बेटांतच असावी. बलीच्या स्त्रीचें नांव विंध्यावाले असें होतें; पुढें वामनरूपी विष्णूनें या बलीस येथून आपल्या मंडळीसह स्वदेशाची वाट धरण्यास निक्षून सांगितलें:- सुतलं गच्छ दैत्येंद्र मा विलंचितुमर्हसि । सर्वैश्चासुरसंघैश्च चिरं जीव सुखी भव ॥

  • बली पाताळांत परत गेल्यानंतर विष्णु त्याचा द्वारपालक होऊन

राहिल्याविषयीं असा उल्लेख आहे:- -- जगाम सुतलं सधो ह्यसुरैः परिवारितः । बलिना सह पातालं आस्तेऽसौ मधुसूदनः ॥ - मबलि पाताळांत जात असतां त्याने वाटॅत जावा बेटाजवळ बलि नामक बैट, व महाबलीपुरं नामक एक शहरहि स्थापिली असावी, असा कित्येकांचा तर्क आहे.;