पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. . या लोकांत सुतल व पाताल हे एकाच अर्थी योजिलेले आहेत; पौराणिक काल्पनिक अतल, वितल, रसातल, तलातल, आदि सप्तपाताल निघण्याचे पूर्वी सुतल, रसातल, पाताल वगैरे शब्द समा- नार्थी उपयोगांत असून त्याच्यानें पूर्वी आपण जीस अमेरिका ह्मणतों तिचाच बोध होत असे. असो. वृत्र व बलि यांच्या या गोष्टींवरून पाहतां, रामापूर्वीह एकदां विष्णूनें राक्षसांस लेकेंतून पळवून लाविलें होतें, असें जें रामायणांत वर्णन आढळतें, त्यांत ऐतिहासिक सत्य असल्याप्रमाणे वाटते. वरील सर्व पुराव्यावरून एवढें मानण्यास काही हरकत नाहीं कीं, रामाच्याहि पूर्वी अनेक शतकांपर्यंत राक्षसांनी येऊन लंका व बहुतेक हिंदुस्थानाचा भाग व्यापिलेला होता व ते आर्थीसहि बराच त्रास देत असत. राक्षस लंकेंत कोठून आले ? राक्षस हिंदुस्थानाजवळील लंका बेटांत व त्या उत्तरेकडील प्रदे- शांत आर्यांस आढळले; पण ते मूळचे कोठले राहणारे व ते लंकेंत कोठून आले वगैरे प्रश्नांचा उलगडा होणे अगदी जरूर आहे. रामा- यणांतील मागें आलेल्या उतान्यांमध्ये राक्षस जेव्हां जेव्हां पराभव पावत तेव्हां तेव्हां ते रसातल ऊर्फ पाताल येथें जात व नंतर पुनः ते लंकेस येत. येवढ्यावरूनच राक्षस मूळचे पाताळाचे रहाणारे असे म्हणतां येणार नाहीं. ( २ ) स्कंदपुराणांतील माघमाहात्म्यांत जी एका राक्षसाची गोष्ट आली आहे, तींत याविषयीं अशी माहिती आहे. त्यानें एका विद्याधरकन्यकेला पळवून नेलें होतें; तिचा दर सोमवारी सोमप्रदोष