पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. सर्वे महीतलं व्याप्तं तेनैकेन महात्मना । तथा सर्वेऽपि ऋषयः वध्यमानाः तपस्विनः ॥ एकदा नर्मदायां वै वृत्रो दानवपुंगवः । दैत्यसेनावृताः सर्वे समायातो यदृच्छया || वृत्रानें याप्रकारें हिंदुस्थानांत कल्लोळ उउविल्यामुळे इंद्रानें त्यास समुद्रकांठी जाऊन मारिलें, असें खालील वर्णनावरून कळते. फेनेन चैवाशु महासुरेंद्रं अपां समीपेन दुरासदेन । चक्रे परं यत्नवतां वरिष्ठो गत्वोदधेः पारमनंतवीर्यम् ॥ यांत इंद्र हा समुद्र तरून गेला असें ह्मटले आहे, यावरून वृत्राचें वासस्थान बहुधा [ राक्षसांची ] लंकाच असावी, असे वाटणें साहजिक आहे. ' अपां फेनानें' ह्मणजे समुद्राच्या फेंसाने वृत्राला इंद्रानें मारिलेली कथा ऋग्वेदांत आहे; व एक राक्षस सेनानायक हिंदुस्थानांत ऋषींस त्रास देऊं लागल्यामुळे त्याच्या समुद्रांतील वसा- हतीवर हल्ला करून त्यास एका आर्यसेनानायकानें मारून टाकिलें असावें. या राक्षससेनानायकास [ आर्यांचा तो शत्रु असल्यामुळे ] वृत्र म्हटल्यानंतर आर्यांचा सेनानायक जो इंद्र त्यानें त्यास वेदांतल्या प्रमाणेच ' अपां फेनानें' मारिलें असें वर्णन करणे ओघानेंच प्राप्त होतें. या गोष्टींतील वृत्र हें नांव व त्यास इंद्रानें अपां फेनानें मारिलें ही वैदिक कल्पना जर सोडून दिली, तर तिच्या मुळाशीं एवढें ऐतिहासिक सत्य राहातें कीं, पाताळांतील कोणी एक राक्षस सेना- १ महीतलं ह्मणजे हिंदुस्थान. २ यावरून हा वृत्र आकाशांतील काल्प- निक वेदांतील देवशत्रु नसून कोणांतरी राक्षस सेनानायक असावा व त्यास आर्यानी वृत्र हे सोईचें नांव दिले असावें; हा नर्मदेच्या कांठांपर्यंत आला होता है ही पुढील श्लोकांचरून कळून येतें. ॐ