पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. उपकाराबद्दल त्या विद्याधरकन्येनें हरिद्रयराजासच वरिलें. या गोष्टींत व सीतेच्या गोष्टींत बरेंच साम्य आहे बलि राक्षसाची गोष्ट. बलि हा रा. ब. वैद्य ह्मणतात त्याप्रमाणें, असुर नसून राक्षसच असला पाहिजे, हें उघड आहे. असुरांचा व आर्याच्या पूर्वजांचा संबंध हिंदुस्थानांत बिलकुल नसून तो हिंदुस्थानाच्या बाहेरच उत्त- रेकडे होता. तेव्हां हिंदुस्थानांत दक्षिणेकडे आर्यऋषींस व राजांस फारच त्रास देणारे लोक बहुधा राक्षसच असावेत हे उघड आहे; बलि हा राक्षस बंगाल्यांत राज्य करीत होता असे अनेक वर्णनांवरून वाटतें; पण हा बंगाल्यांत कोठून आला होता व पुढें वामनरूपी विष्णूनें त्यास हिंदुस्थानांतून कां हांकून लाविलें, याविषयीं सविस्तर हकीकत पाहिजे होती, पण ती रामायणांत मिळत नाहीं. ती दुसरी- कडे कोठें तरी मिळते की काय हें पाहत असतां, स्कंदपुराणांतील केदारखंडाच्या अ. १६-१९ मध्यें ती आढळली. ही बलीची हकीकत अत्यंत महत्त्वाची आहे. बलीस या सर्व हकीकतींत ' दैत्य' मटलेले आहे. बाल हिंदुस्थानांत येण्यापूर्वी पातालांतून वृत्र इकडे आला होता; त्याचा जेव्हां इंद्राकडून पराभव झाला तेव्हां बलि इकडे मोठ्या सैन्यानिशीं आला: -- पुराऽमृतमंथने ... प. वाचना पानालान्निर्गता दैत्या: ये पातिताश्च सुरैः सर्वे भृगुणा जीविताश्च ये बलिं विना च ते सर्वे वृत्रं अभ्याययुस्तदा । तैः समेतः तदा वृत्रः पातालादागतः त्वरीतूल ॥ तं ॥