पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ रामायणनिरीक्षण. रावणास नर्मदेच्या कांठीं माहिप्मती शहरांत असलेला हैहयाधिपति- कृतवीर्याचा पुत्र–सहस्रार्जुन यानें जिंकून त्यास कैद करून नेलें; पण पुढे पुलस्त्य ऋषींच्या विनंतीवरून त्यास सोडून देण्यांत आलें ! असो. स्कंदपुराणांत माघमाहात्म्य ह्मणून एक भाग आहे. त्याच्या ९ व्या अध्यायांत एका राक्षसाची मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. एक शूलधारी राक्षसाने एकदां एक विद्याधरजातीची कन्या उचलून

  • नेली:-

--" सलिलार्थ व्रजंतीं तां आजहार स राक्षसः । कक्षे निक्षिप्य गतवान् समुद्रांतर्गृहं महत् ।। " हा समुद्रांत राहत असे:-- समुद्रसलिलागाधे नगरीं निर्मिमे शुभे ॥ प्राकार परिवेष्ठारां चतुर्द्वारोपशोभितां । प्रासादानेकचित्राभां स्वर्णतोरणभूषिताम् || -- ही समुद्रांतील नगरी कोणती हें जरी दिलेलें नाहीं, तरी ती लंकाच असावी असे वाटणें, वर्णनावरून साहजिक आहे. त्या राक्ष- सानें त्या विद्याधर कन्येला सीतेप्रमाणेंच नेऊन [ लंकेंत ] बंदीत · ठेविलें, तिला त्यानें आठ महिन्यांची मुदत देऊन, त्या मुदती- नंतर तिच्याशी लग्न करण्याचें त्यानें ठरविलें. मासाष्टके गते पश्चात् सोऽपि मां परिणेप्यति । सोऽपि चोद्वाहपर्यंतं न मां गच्छति कामुकः ॥ असे तिनें एकदां नारदऋषीस सांगितले आहे. नारदानें पुढे सौराष्ट्र देशच्या हरिद्रथ राजास ही हकीकत कळवून त्याजकडून त्या विद्याधरकन्येला त्या मुदतीच्या आंत मुक्त करवून आणिलें आहे. या १ हें शिव पार्वतीस सांगत आहे.