Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रामदासवचनामृत
(संकीर्ण ग्रंथ)


६. जुना दासबोध,


८५. देह पडे कां देव जोडे !
निग्रहनेमाचं बळ । असतां प्राप्ति तात्काळ ।
दुराशा करी तळमळ । निग्रहभ्रष्टो ॥१३ ॥
जेथें निग्रहेसी धार्ष्ट्य वसे । तेथें देव सन्निधचि असे ।
सोडी संशयाचे पिसें । एतद्विषयीं ॥ १४ ॥
तरी निग्रह धारिष्ट जडे । हे वैराग्येवीण न घडे ।
दृढ वैराग्य होतां उडे । पांग देहाचा ॥ १५ ॥
देह पडे कां देव जोडे । ऐशी हांव आंगी जडे ।
तेणें गुणें वैराग्य घडे। महाप्रबळ ॥ १७ ॥
देहपांग[] निःशेष भंगे । तेव्हां प्राप्तीसी वेळ नलगे ।
देव भक्तापाठी लागे । "नाभी[] नाभी' म्हणोनि ॥ १८॥
बाळक आपणा रक्षू नेणें । म्हणोनि मातेसि लागे रक्षणे ।
तेंचि बाळक शहाणे । होतां माता विसंबे[] ॥ १९ ॥
तैसा भक्त भगवंती प्रेमा । लावूनि उलंघी देहसीमा ।
तयाचा सांभाळ आत्मयारामा । करणे घडे नेमस्त ॥ २० ॥

  1. इच्छा.
  2. भिऊ नको.
  3. दुर्लक्ष करणे.