पान:रामदासवचनामृत.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत आजामंत छापले आहेत त्यांतूनच होतां होईल तो पुढील वेंचे घेण्यांत आले आहेत. परंतु जे समर्थाचे ग्रंथ अयाप अत्रकाशित आहेत. त्यांबद्दल दुसरीकडुन वेंचे घेण्याची योजना केली आहे. रामदासांच्या मूळ ग्रंथापकों पण अद्याप अप्रकाशित अशा “ दासबोधाच्या सोलीव अर्थी" तील एका उतान्याबद्दल रा. देव व रा. गणेश गोविंद कारखानीस यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. दासबोधाचा सोलोव अर्थ काय आहे हे या उतान्यावरून सहज कळेल. रामदासांच्या संकीर्णग्रंथांपैको करुणाष्टके, मनाचे श्लोक, जनस्वभावगोसावी, इत्यादि प्रकरणे या पुस्तकाच्या दुस-या भागांत उध्दत केली आहेत ती वाचकांच्या नजरेस येतीलच. ८. रामदासांच्या समकालीन मंडळीमध्ये त्यांचे वडिल बंधु रामीरामदास यांचा येथे प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. रामीरामदास हे रामदासांच्या अगोदर तीन वर्षे जन्मन रामदासांच्या अगोदर तीन वर्षे समाधिस्थ झाले. हे प्रत्यक्ष जरी रामदासीसांप्रदायामध्ये नव्हते, तथापि रामदासांचा व त्यांचा पुष्कळ संबंध आला असला पाहिजे हे उघड आहे. यांचे " भाक्तिरहस्य" व " सुगमोपाय " हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. रामदासांच्या शिष्यांपैकी कल्याण हे प्रमुख होत. रामदासांच्या आज्ञेवरून रामदासांनी देह ठेवण्यापूर्वी तीन वर्षे हे डोमगांव येथे मठांत जाऊन राहिले; आणि रामदासांच्या देहावसानानंतर तेहतीस वर्षांनी ह्मणजे शके १६३६ त त्यांनी देह ठेविला. त्यांनी रामदासांच्या इतर काही शिष्याप्रमाणे चाफळ व सज्जनगड येथील व्यवस्थेसंबंधी तंट्यांत भाग घेतला नाही. रामदासांच्या शरीराचे शके १६०३ मध्ये सज्जनगडावर दहन केल्यावर त्यांच्या अस्थि चाफळ येथे आणन तेथील वृंदावनाखाली ठेवण्यांत आल्या. बरीच वर्षे त्या अस्थि गंगेस पोहोचविण्यासंबंधी विचार चालला होता. शेवटी एकदां ज्या दिवशी त्या अस्थि गंगेस पोहोचविण्याकरितां वृंदावनांतून बाहेर काढण्यात आल्या, त्याच दिवशी कर्नधर्मसंयोगानें कल्याणांनी डोमगांव येथे आपला देह ठेविला. व गुरूच्या व शिष्याच्या अस्थि एकदमच चाफळाहून डोमगांवावरून काशीस नेण्यात आल्या. रामदासांचे आणखी दोघे प्रमुख शिष्य म्हटले म्हणजे दिवाकर गोसावी व उद्धव गोसावी हे होत. या उभयतांमध्ये रामदासांच्या निधनानंतर बरीच वर्षे मठाच्या व्यवस्थेसंबंधी तंटा चालला होताः रामदास जिवंत असतांनाच त्यांनी दिवाकर गोसावी यांस मठाची व्यवस्था