पान:रानवारा.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुडदाबी धडसा हाती लागू देत न्हायती. मास काढून घेत्याती. पोतं शिवल्यावाणी शिवून एवढस्सं लोळागोळा झाल्यालं गठळं हवाली करत्याती. त्येंचं समदं येवस्थशीर होईपतूर, काळजावर दगूड ठिवल्यावाणी गप व्हायाचं. आपल्या माणसासाठी रडायचीबी तिथं चोरी. मढं घ्याचं नि मुकाट्यानं गाव गाठायचं. ह्यो त्या दवखान्याचा कायदा ! त्या शिवलेल्या मढचाला आंगूळ घालाय येत नाय का काय नाय. नुसता वनवास जित्त्यापणी वनवास, मेल्यावरबी वनवास म्हणून मी शॅप सांगून टाकलं, कितीबी खस्ता खाव्या लागल्या तरी खाईन रात रात जागून हाडाची काडं करीन, पण मी माझ्या हातानं माझ्या कमाला दवखान्यात धाडायची नाय. मी सोत्ता पायजे तेवढी सेवा करायला खंबीर हाय म्हणलं. 2 .. एवढं सारं बोलताना तिचं डोळं अश्रूंनी सारखं भरून येत होतं. · आई ! . . . रडू नकोस कीऽऽ' नाय, पोरी. मी. मी कुठं रडतीया? नाय रडत. तू नको जीवाला लावूस. तू रडायला लागली की तुला सोसत नाय, तरास पडतो. मला काय धाड भरतीया. असं म्हणत कमलच्या डोक्यावरून तिचा हात पुन्हा मायेनं फिरू लागला; पण बाजूला तोंड फिरवून अश्रू लपवायचा तिचा प्रयत्नही चालू होता. जाधवबाईंनी विषय बदलून वातावरणातला ताण कमी करण्यासाठी विचारलं, ‘आता कुणाचं औषध घेता ? 'वाडीच्या माणसाचं घेतो. झाडपाल्याचं हाय. एक दिसा आड वाडीला जाऊन आणावं लागतं. गायच्या लोण्यात कालवून लावायचं असतं. लई शास्तार पाळाय लागतं. इटाळ-चंडाळाचं संबाळाय लागतं. देवीची पूजा चुकवायची नसती. रोज जुडगाभर उदबत्त्या पुरत न्हायत्या.' गुण येतोय ना ? ' व्हय... J . 1 गुण हळुहळु येणार, देशी औशीद हाय. औशीद लावलं की तासाभरानं भाजल्याली जागा तटतटायला लागती. माझी कमा लई ओली जखम । ९०