पान:रानवारा.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दारात कालवाच. यसवंतानं चादरीत गुंडाळून आडवीच आणली हुती. खिन्भर मी भयाकलीच. काय झालं नि काय नाय कळंनाच मला. उभ्या उभ्याच गप झाली मी. मला जावंनं खाली बसीवलं. म्हणली, 'बायसाब घाबरू नका. जरा भाजलंय कमाला. बाकी काळजीचं काय नाय.' तवा मन जरा शांत झालं. आमचं भावसाब म्हणलं, तालुक्यात दवाखान्यात न्ह्याची, पण बाकी सारी नकोच म्हणली. नाय न्हेलं.' ' दवाखान्यात नेलं असतं, तर बरं झालं असतं.' ' कशाचं बरं म्हणता मास्तरीण, सारं बघून बसलीया मी. तुमाला लांबचं नाय सांगत, माझी चुलत भावजच भाजली हुती. शेकत बसती हुती, पाठीमागनं कवा पदूर पेटला, काय कळलंच नाय बगा .. .. तर भाजली, गाडीत घालून न्हिली तालुक्याला. दवाखान्यात आडमिट करून मला तिच्या संगती ठिवलं. माझा चुलत भाऊ रोज भाकरी घिऊन दवाखान्यात येत हुता. काय सांगू त्या दवाखान्याची तन्हा कुत्रं हाल खायचं न्हाय. बाई ! माझी वैनी गुरावाणी आराडायची. दगडाला पाझर फुटला आसता बगा. पण त्या दवाखान्यातल्या नर्सा लई दगडाच्या काळजाच्या. ' भीक नग पण कुत्रं आवर ' आसं म्हणायची पाळी येती. लई आबाळ करत्यात बगा. जवातवा अंगावर खेकसत्याती. कुत्र्या- वाणी दैना करत्याती, आजाऱ्याची नि संगती जाणान्याचीबी. वाटतं, कशाला दवाखाना गाठला ?.. भाजलेल्या माणसाच्या यातना थोड्या आसत्यात का ?.. आवं, बॉट भाजलं तर तासभर आपुन फूऽऽफू' करतो. समदं आंग भाजल्यावर काय होत आसलं जीवाचं ?.. सोताच्या जीवापास्न दुसऱ्याचा जींव जाणावा. त्या माणसानं काळीज फाटून जायाजोगतं आरडायचं नि ह्या नर्सा वसावसा अंगावर धावत्याती, नायतर आज्याबात बगतच न्हायत्या. औशीदाचं डॉस आपुनच यळंवर पाजायचं, आजान्याची सेवा आपुनच करायची ह्यांनी काय करायचं तर, केस हाताला लागणार नाय.' आसं आगुदरच भाकीत सांगायचं. मग बळी द्याला गेल्यावाणी दवाखान्यात जाच कशाला? माझ्या मावळणीचीबी आसीच केस झाली. माणूस जीवानिशी जातंच, पण पायलं त्ये सांगते; आवो बील पदरात आवळायला घेत्याती , .. .. डोळयानं आन् मेलेला ओली जखम । ८९ CC ... .. .. "