पान:रानवारा.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाजरी,. .. सोसत नाय तिला, . आंराडती - -- काळीज फाटतं ऐकणाराचं; पण भोग हायती, म्हणून डोळयावर कातडं वढायचं, एका दिसा आडानं खपल्या पडत्याती; पण आतलं मास दिसतं, त्येच्यावर कातडं चढंना• जखमा मिळून येईनात अजूनी, भाजल्या वांग्याचा काचुळा सुटावा तसं हुतं.' .... " किती दिवस लागतील म्हणून सांगितलं त्या वैदुनं ?' '... तसं काय नाय सांगितलं बगा; पण खस्ता लई घ्याव्या लागत्याल, इटाळ-चंडाळ पालावा लागंल, आसं सांगितलं. आजायाच्या किती खस्ता खाव्या लागत्याती, आपुन जाणतोच. त्यात ह्ये भाजल्यालं माणूस. रोज आंग पुसून काढायचं. लोण्यात औशीद खलून लावायचं. रोजच्या रोज केळीची पानं आणून बदलायची. खाणं-पिणं बघायचं परसाकडची लघवीची येवस्था करायची. पोरं तर काडीची मदत करीत न्हायती. सैपाकपाण्याकडं माझा हात पोचत नाय. हिचंच सारं वगण्यात दिस कधी जातो कळत नाय. खर्चानं तर त्वांड वासलंय. रोजच्या रोज दूध, दराक्षी, मुसुंब्या, डाळींब, आसलं जिन्नस आणावं लागत्याती. ती एकांदा घास घेती, पण घरातल्या पोरट्यांची मुरकंड पडती त्येच्यावर. काय बोलावं तर त्येंच्या आयास्नी राग येतो. माझं गीरं फिरल्याती, दुसरं काय नाय.' करा. • इतर गोष्टीकडं तुम्ही लक्ष देऊच नका. हिचं तेवढं व्यवस्थित पहात जा. जमलं तर एखाद्या डॉक्टरचं घरच्या घरी औषध दवाखान्यात नका नेऊ, पण घरात औषध घ्यायला... " ' नाय. तसं करता येत नाय. ह्ये औशीद हाय तवर दुसन्या कुठंल्याबी औशीदाचा इटाळ करायचा नाय, आसं वाडीच्या बाबानं सांगितलंय. नायतर त्येच्या औशीदाचा गुण जाईल नि देवीचा कोप हुईल. माझ्या म्हायेरची देवी हाय ती. लई कडक हाय. तिचा कोप लई वंगाळ आसतो; म्हणून दम धराय पायजे,. .कवा माझ्या या सराचं वनवास संपत्याती पांडुरंगाला डोळं.' त्या खोलीतल्या एकेका वस्तूचा संदर्भ आम्हास कमलची आई बोलत असताना लागता होता. एका खुंटीला देवीचा फोटो अडकवला होता. ओली जखम । ९१