पान:रानवारा.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारं सांडून अंगाखाली जाईल. त्यात्नं आणिक काय झालं मजीं ? करायचं?' ...काय हुंदका आवरण्यासाठी ती ओठ मिटवू पाहते. ओठांची वेडीं-वाकडी हालचाल. थरथर. केविलवाण्या नजरेनं ती आईकडं पहाते. थोडावेळ MP स्तब्धता. पुन्हा खिचडीचा घास पुढे आल्यावर तिने तोंड उघडले. चिमणीचं पिलू आठवलं. पण चिमणीच्या पिलाचे डोळे इतके व्याकुळ-आतं असतात का ? नसतातच. येथे भुकेशिवाय आणखी एक वेदना न शमणारी. चिमणीच्या पिलाजवळ नसणारी ! दुसऱ्या कडून चिमणीच्या .... घरट्यात गेलेल्या माझ्या मनाला चिमणीचं पिलू सुखी वाटलं आणि सुदैवीही. त्याचा हेवा करून मन परत फिरलं कातर होऊन- खिचडी भरवणं संपलं होतं. चमच्यानं पाणी पाजताना तिच्या आईच्या नजरेत ठसक्याची भिती उभी राहिली होती. हाताला कंप सुटला होता. कमलची नजरही घाबरी झालेली दिसत होती. ! बास्स !...'


हात वर करून ती म्हणाली. त्या थांबण्यात- थांबविण्यात तृप्ती नव्हती. अधिक वेदनेतून सुटका मिळविण्याची ती धडपड होती. तिच्या आईनं तिच्या गळयावर, मानेवर, सांडलेलं पाणी फडक्यानं पुसून काढलं. लघवी-शौचाच्या बाबतीत याहूनही अधिक त्रास होत असेल हे उघडच होतं. कमलच्या उशाशी बसून, तिची आई आमच्याशी बोलायला लागली. म्हणाली, 'आज आकरा दिवस झालं, माझी कमा नुसती माशावाणी तडफाडतीया. नशीबाला भोग आला बगा. वाचली त्येच नशीब म्हणायचं. मायंदाळी जोव खाती, परक्षा बुडणार म्हणून लई वंगाळ वाटतं तिला; पण इलाज हाय का ? व्हणारी गोष्ट चुकत नाय... जेवणाची येळ झाली हुती. पुस्तक वाचीत सोप्यात बसली हुती. मीच म्हणलं चंडाळणीनं, कमा, इमलला घिऊन ये जा.' पुस्तक तिथंच ठिवलं नि कंदिल घिऊन लगालगा गेल्याली बगितली मी म्हणलं, आता इल-मग इल... तेवढ्यात .... L ओली जखम । ८८