पान:रानवारा.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिला नुकतंच नहायला घातलेलं दिसत होतं. कसं घातलं असेल ? नुसत्या विचारानंच माझं सारं अंग लसल्यासारखं झालं. तिचं शरीर सुकून गेलं होतं. सुन्न मनानं नुसतं पहात राहण्यापलिकडं आम्ही काही करत नव्हतो. काही बोलावंसं वाटत नव्हतंच. पुढचं दृश्यही पहावत नव्हतं. तेवढ्यात हातात खिचडीचं भांडं घेऊन कमलची आई बाहेर आली. म्हणाली, 'आज कमलची चतुर्थी. मघाशी न्हायाला घातलं तिला.' तिनं कमलंला खिचडी भरवायला सुरूवात केली. मघापासून माझ्या मनात डोकावणारा प्रश्न मी विचारलाच, ‘न्हायला कसं घालता तिला ?' 'न्हायाला व्हय ?.. हिथंन आल्लाद दोघी-तिघीनं तिला उचलून खाटंवर ठिवायची. डोक्सं गादीवर ठिवायचं नाय. आतराळी धरायचं. खाली घमॅलं ठिवायचं. एकीनं शिक्काईचं पाणी घालायचं. दुसरीनं चोळायचं. तिसरीनं पाणी घालायचं.' हंऽऽ ! • च्चss ! बरंच त्रासाचं आहे हो.' 4 व्हय. तरास हुयाचाच. कर्मदशा हाय. भोग हाय. भोगाय पायजें. काय करायचं.' ती आपल्याशी बोलल्यासारखी बोलून उसासली. तेवढ्यात ..... कमलला उसका लागला. तिची असह्य हालचाल. आईच्या मनाची उलघाल तिच्या डोळयातल्या पाण्यात. आम्हा दोघींचा जीव उडालेला. काय होतंय कुणास ठाऊक ? उगीच आतून मन कातरल्यासारखं झालं. दोघी बावरलो. पुन्हा तिच्या आईकडं पाहिलं. ती मनःपूर्वकतेनं - सावधतेनं चमच्यानं कमलला पाणी पाजत होती; पण ते एवढं- एवढं पाणी तिला पुरेसं होत नव्हतं. ' पोटभर पाणी पाजून तरी मार मला.' असं म्हणताना तिच्या डोळयात दाटलेली आसवं आमच्या डोळ घात करूणा भरत होती. ' शांत हो बाई. तरास करून भोग सरत नाय, माझ्या लेकरा ! मोठ्या भांड्यानं तुला कसं पाणी पाजायचं ?... अं ?... ओली जखम | ८७