पान:रानवारा.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कायम ठेवण्याचा काही माणसांनी जणू वसाच घेतलेला असतो. त्यांच्या तोंडाला कशाला लागा ? तिथंच विषय सोडून दिला. त्यावर एक-दोन दिवस गेले असतील. कमलच्या वर्गातील तिची मैत्रीण शाळेत निघालेली मला दिसली. तिला हाक मारून मी विचारलं, " कमलला दवाखान्यात नेलं का ग ?' नाही नेलं. घरीच देशी औषध चालू केलंय.' त्यावरून मला वाटल, बरं होण्यासारखं असेल, म्हणून नसेल नेलं. दुपारी घर सारवत होते. तेवढथात जाधवबाई आल्या म्हणाल्या, • कुठंपर्यंत आलंय सारवण ?" ‘ आलंय माझ्या पुढ्यात.' C त्या हसल्या. म्हणाल्या, 6 थांबू का ? ‘ येते की. बसा थोडं...पाट घ्या.' त्या बसल्या. मीं घाईनं सारवण आटोपलं. रस्त्यात बाई म्हणाल्या, दहा-आकरा दिवस झाले. देशी औषध घेतात म्हणे. म्हटलं बघून " तरी यावं. 6 कमलला बघून यावं म्हणतेय, तुम्ही येताय का ?" जखमा बऱ्या व्हायला आल्या असतील.' " तेच तर. पाहिल्याशिवाय काय कळणार ? कोणाला नीट विचारावं, तर सतरा फाटे फोडतात या खेडवळ बायका. कुठून विचारलं असं होतं. ' " नाही तर काय. मलाही समजलं देशी औषध सुरू केलेलं. कमल तुमच्या नीमाच्या वर्गातली, नाही का ?' 'हो ना. यायची मधून-अधून घरी. नीमाची नि तिची चांगलीच मंत्री आहे.' 'हो ना, आमच्याकडे नीमा आली की तिच्या बरोबर ती असायचीच. फारच बडबडी नाही ?' 'तर हो, नीमाच्या मैत्रिणी घरी आल्या म्हटलं की, अगदी चिवचिवाटच. त्यात ही कमल तर विचारूच नका. आमच्या सासूबाई तर ओली जखम । ८५