पान:रानवारा.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' माणसाला खातो त्यो. ' तसं न्हवं पण.. 3 गप दोडा ! तुझं सदा न् कदा भ्याच. जरा काळीज घट कराय शीक.' मला जाणाऱ्या माणसाच्या प्रवाहातून सारं काही ऐकून समजलं होतं. एक वाईट प्रसंग टळला होता. ‘ मास्तरीणबाई, तुमी रस्त्यावर येऊन उभं हायसा, समदा गोंधुळ ऐकू आला तुमास्नी ?" L 'हो. म्हणूनच बाहेर आले. कमा भाजली वाटतं.' व्हय. देवाच्या दयेनं थोड्यात निभावलं म्हणायचं.' " पाय-मांड्या भाजल्यात न्हणे. औषध-पाणी करावं लागंल.' कुणाला ठावं बाय. काय करतात काय की, चार सालं झाली आसत्याली बगा. आमच्या हृतं मुंबेवाल्याची फेसनवाली बायकू-नवी नवरीच, आसी भाजली हुती दारूकामाच्या औशीदानं भाजली हुती बगा. तिच्या वटी पोटाचं भदं झालं हुतं-चार दिवस बाई गुरावाणी आरडत हुती. पाचव्या दिवशी खल्लास झाली. आपलं माणूस मरणार ह्ये दिसत हुतंच; मग दवाखान्यात न्हिऊन, मांस काढून, शिवून त्येच्या देहाचं हाल नगती, म्हणून रावसाबांनी दवाखान्यात नाय न्हेलं. आयव-सवय गोली बिचारी. आता कमा इतकी भाजली नाय म्हणा, सिरेस केस नाय ती. मग कशाला न्हेत्याल ? ... मला खात्रीनं नाय सांगाय येत, पण दवाखान्याला नेत्याल आसं नाय वाटत.' 6 • तिची परीक्षा जवळ आलीय. मॅट्रीकला आहे ती. दवाखान्यात नेल्याशिवाय का लवकर बरी होणाराय ती ?" 'आवं बाई, आता परक्षा बुडल्यातच जमा हाय बगा. पदरकरीन लेक, आई-बाप लग्नाचं बगत्याली का परक्षा-दवखाना बगीत बसत्याली?... आजकाल पोरो-बाळीबी लईच थेर कराय शिकल्यात्या. नायनलचं पातळ निसून कुणी कंदीला म्होरं उभं न्हाईल का ? मला सांगा. " झाल्या गोष्टीला इलाज नाही.' असं म्हणून मी पण घरात आले; नाहीतर आपला हेका चर्चेतसुद्धा ओली जखम । ८४