पान:रानवारा.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" ' आन् कुणाचं मन थाऱ्यावर हुतं ? काय करावं त्येच समजंना...' • तर काय ! तिचा चुलता हुता म्हणून बरं. त्येनं घोंगडं अंगावर टाकून भुईवर आडवी केली तिला. पाताळ वढून-फाडून काढलं. आतला परकरबी पेटला हुता. त्योबी फाडून काढालान् चुलता हुता, बाकीच्या माणसाकडनं आसलं काम झालं आसतं का ?' 5 आन् तिनं अंगाला हात लावू दिला असता म्हंता का ? उभी पेटाय लागली तरी माणसापस्न लांब लांब पळत हुती.' 'घराकडं न्हेताना घोंगडं रूताय लागलं अंगाला, म्हणून मी बाळकूला म्हणलं तुझी चादर टाक बाबा, त्या मायभनीवर... " चादरीत गुंडळून न्हेतानाबी लई आरडत हुती. काय बाय झालं यकायकी ... हातातोंडाला आल्याली लेक, वाचली म्हणून बरं, नायतर आयबापानी काय पाह्यलं आसतं आज ?" आनसे, तुला ठावं हाय का, नारू अण्णा लेकीसाठी थळं बघतूया ( म्हणं. ' आसंल बाय. न्हाती धुती लेक झाली, यकदा ज्याच्या त्याच्या ठिकाण्यावर गेलं की, घोर मिटतो.' ' आगदी भैरूबानं बचाव केला बग, कमाचा. आता दोनी पायाच्या मधीच भडका झाला कंदिलाचा, म्हणून नाजूक कातडं भाजून निघालं, पण कपड्याभाईरलं आंग इद्रूप नाय झालं, ह्ये नशीबच.' 6 व्हय, बाय. कंबरपातूर मांड्या-पाय यवढंच भाजलं बाकी बचलं. लोकाच्या घरी जायाचं हाय. लेकीची जात. जरा पडाक बाजू आली तर हुंडा वाढवूनबी लगीन ठरता ठरत न्हाय.' 'कमा, मस्त देखणी हाय, केळीच्या कोंबावाणी गोरीपान. आय- बाच्या पुण्याईनं आजचं संकट टळलं. तरीबी राजाक्का, तिला सातान्याला दवाखान्यात न्यावं लागणार.' 9 " व्हय. दवाखान्यात न्हेल्याबिगार सत ना गत. जखमा मिळून याला व्हव्यात.' • मला बया दवाखाना म्हणलं की भ्याच वाटतं.' ओली जखम । ८३