पान:रानवारा.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' धरल्याती, म्हणून पडूनच हाय. हिराकाकी एवढं बोलून माकडाचा खेळ बघण्याच्या उत्साहात निघून गेल्या. मी दार लावून घेतलं. रेडिओ लावला. नभोनाट्य चालू होतं. अंथरूणावर पडून ऐकत होते. मुलं झोपली होती. बहुतेक सगळे शेजारी खेळ पहायला गेल्याने वाड्यातही शांतता होती. किती वेळ गेला समजले नाही; पण दंगा ऐकू येऊ लागला. प्रथम वाटलं नभोनाट्या- तील आवाज आसावा; पण रेडिओचा आवाज कमी केला, तेव्हा ग्राम- पंचायतीच्या बाजूने आरडाओरड- किंचाळ्या स्पष्ट ऐकू येऊ लागल्या. मी रेडिओ बंद करून दार उघडले. • मास्तरीणबाई ! कसला दंगा झालाय वो ?' शेजारची सुशीला मला विचारत होती. ती बाळंतीण म्हणून घरातच होती. ( मला तरी काय माहिती ? बाहेर जाऊन बघते. फारच दंगा ऐकू येतोय.' आणि मी वाड्याबाहेर गेले. रस्त्याने माणसांचा लोंढा कलकलाट करीत येत होता. काहीतरी भयानक घडलं होतं. माणसं एकमेकात मोठ-मोठचानं बोलत होती. ' देशमुखाची कमा पेटली. तरी बरं चुलता हुता म्हणून वाचली; J नायतर वांगं झालं असतं. ... काय बुद्धी फिरली बगा की, लहानग्या भनीला जेवाय .. बोलवाय आली. " खेळ बघून तीबी गुटमाळली. आताशी पातळं नेसाय शिकल्याली, तीं तरी कुठं जाणती हाय ?.. .. 3 ओली जखम । ८२ , ' कंदील पुढयात ठिवून, बघण्याच्या नादात कधी पातळ पेटलं त्ये कळलंच न्हाय.. ‘पेटल्यावर खुळीबावरी झाली. वरडत - आरडत पळाय लागली. यकायकी भूत म्होरं नाचाय लागल्यावाणी झालं. समदीच लागली वरडायला. कुणाला काय सुचना का समजंना....' . माझी तर बोबडी वळली, कापरंच भरलं अंगाला.'