पान:रानवारा.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा अगदी अलिखित नियम. निसर्गातील ऋतुपालट जितक्या सहजतेनं होत असतो, तितक्याच सहजतेनं या शेतकरी वर्गाची शेतातील व भावकीची कामं चाललेली असतात. त्या कामाबद्दल त्यांच्यात कधी तेढ यायची नाही, खळखळ व्हायची नाही. या कष्टक-यांचं विसावलं जीव करमणुकीला आसावलेलं असतात. सुगी विकून थोडा पैता गाठीशी आलेला असतो. घरात कनगी टोपली भरल्या पोटानं उभ्या असतात. हाच मोका साधून डोंबारी, मदारी, दरवेशी आणि असेच भटके खेळवाले, खेडोपाडी आपले खेळ करून शेतकऱ्याच्या सुगीनं आपली ओटी भरत असतात. सारा खुशीचा सौदा. धान्य किंवा अन्न देऊन ही करमणूक करून घेणं शेतकऱ्यांना परवडतं. त्या बदलीच्या गावी अशाच एका रात्री ग्रामपंचायतीच्या पटांगणात माकडवाल्याचं डमरू वाजू लागलं. माकडवाल्याच्या आरोळ्या- डमरूचा आवाज आणि त्याबरोबर खेळ पहायला आलेल्या लोकांचा गोंगाट कानावर पडत होता. " आवो ! मास्तरीण बाय, झालं जेवण ?' • हो. झालं की. तुमचं ?' व्हय. आटापलं. खेळ बगाय जातूया आमी.' • रात्रीचा कसला खेळ करतात देव जाणे. दिवसा खेळ करायला.. • आवो, बाई, ह्ये गाव गाठायला त्येला कडुसं पडलं आसंल .आज हिथं खेळ केला की उद्या त्येला म्होरलं गाव गाठून खेळ दावता येईल. हातावरंच त्याचं प्वॉट. आपल्यावाणी रात आन् दिवस आसं मोजून कसं त्येचं जमंल वो ?' " हं. खराय. बरं का बाई, रातच्या खेळाला सारी माणसं गावात असत्याती. या भटक्या जातीला पब्लीकनं गर्दी केली की खेळ करायला लई हुरूप येतो बगा." • अस्सं कोण कोण चाललाय खेळ बघायला ?' • समदी. आमची म्हातारी तेवढी हाय घरात. वातानं गुडगं ओली जखम । ८१