पान:रानवारा.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओली जखम 19 सुगी आटोपली होती. शेतक-याचं हात थोडं विसावलं होतं. काही शेतात बागायती पिक होतं; पण त्यासाठी शेतकऱ्याला रात्रंदिवस शेतात खोळंबून रहावं लागत नव्हतं. आसपासच्या गावांच्या जत्रा याच दिवसात मागं-पुढं एक-दोन दिवसाच्या फरकानं भरायच्या. 'देव-देव ' करता येईल आणि ' जीवाची करमणूकबी ' होईल म्हणून शेतकरी जत्रंला जायचे. जत्रंदिवशी ' छबिना ' निघायचा. देवाचं दर्शन घेऊन, गुलाल खोबरं उधळून व्हायचं. दुसऱ्या दिवशी खेळणं. कुस्त्याचा फड भरायचा. रात्री तमाशाचा फड रंगायचा. दोन दिवस जागून घेतलेलं जत्रच ' सुख ' आठवत शेतकरी पहाट आपल्या गावच्या रस्त्याला लागायचा. " " याच दिवसात लग्नाला ' आलेल्या पोरा-बाळाची लग्न ठरवायची' लाट यायची. भावकीच्या कामात शेतकरी पेरणीच्या कामाइतकाच दक्ष , असतो. कधी कोणाच्या पोरासाठी कुण्या गावची 'पोरगी ' • बघाय जायचं. कधी कुणाच्या पोरीसाठी कुण्या गावचं 'स्थळ बघून यायचं. बैठकीला हजर व्हायचं. सुपारी फोडायची. कुणाचा ' बस्ता बांधाय जायचं. गावात कुणाचं का 'लगीन' असंना तांदळाला', हजर रहायचंच ·