पान:रानवारा.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" 'मला त्यो तोडल्याला जागा मोठ्या नागाच्या इटुळयावाणी वाटतो.' मग तू नाय ना सांगणार आईला ?" आक्का थांब इथं. ' नाय,.. ( का रं ? काय झालं ?" ' मी उतरतो आता.' " उतर. मला वाटलं आता घरापतूर तुला घ्याला लागणारं.' ' माजं पॉट लई जाम झालंय. पाठीवर बसल्यावर लईच 6 आवळल्यावाणी झालं.' मग आता घरी गेल्यावर जेवणार न्हाइस ?' ‘नाय.' ' आणलंस का वांद ?” का ? काय झालं ?" " आई संशय घेणार. तू सारंच उघडं पाडशील.' " काय ? निवदाचं व्हय ? • नाय. थोडं खाईन.' घरच्या ओढीनं दोघांची पाऊलं भरभर पडत होती कांत्या वेशीपर्यंत शांतीबरोबर चालला, पण गावात शिरल्यावर मात्र पोरांच्या टोळक्या-टोळक्यानं चाललेल्या विटी-दांडूच्या खेळाकडं त्याचं लक्ष जावू लागलं. त्याचं बखोटं धरून शांती त्याला ओढत होती. घराच्या आंगणात येताच कांत्यानं आपला हात शांतीच्या पकडीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. शांती त्याला दटावून म्हणाली, 'कांत्या, माझ्यासंग थोडं खाल्ल्यासारखं कर नि मग खेळायला ये भाईर.' कांत्या मुकाट्यानं तिच्याबरोबर घरात गेला. तिच्या पुढयात एका ताटात जेऊ लागला. मधेच ' मला बास' म्हणून अंगणात पळाला. शांती जेवता जेवता आठवत राहिली. या कांत्यानं तिला अनेक वेळा अडचणीत आणलं होतं. तिला पेचात आणून मनात येईल ते वसूल केलं होतं. ती मनाशी म्हणाली, उद्या ह्यो कांत्या म्हणील, 'काल मी तुझ्या ताटात कमी जेवलो. कालची माझ्या वाटणीची पोळी दे. नायतर मी संमद आईला सांगणार. पोळी दे नाय तर कोकरू कर मला.. तिला काहीतरी सुचल्यासारखं झालं आई कामात आहे, असं बघून निवेद । ७८