पान:रानवारा.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" मला लई भूक लागलीय. ' 'मलाबी लागली रं, म्हणून तर एक घास घेतला.' " एक नाय, लई खाल्लंस तू. माझं ध्यान न्हवतं तवर खावून घेतलंस. मी सांगणाराय आईला.' एडआसरं काय. देवाशप्पत मी एकच घास घेतला. मग मला निवडुंगाची बोंडं काढून दे.' " चल देते.' शांतीनं सात-आठ लालबुंद बोंडं काढून त्यांची कूस झाडून कांत्याला दिली. ती हपापल्यासारखी त्यानं खाल्ली. शांतीनं वाळूत झरा काढला. त्याचे पाणी दोघं पोटभर प्याली आणि घराच्या वाटेला लागली. शांतीच्या मनाला झाल्या गोष्टीची रुखरुख लागली होती. ' कांत्या आईला निवदाचं सांगू नको हां.' • मला तू पाठीवर कोकरू घेतलंस तर नाय सांगणार.' ( ह्ये रं काय कांत्या ? आगुदर माजा जीव मला जड झालाय. त्यात तुजं कोकरू. माज्या पायाला गोळं आल्यात, तुज्या पोटात भर तरी गेलीया.' ( " 6 • मग नको घेऊस. मी सांगणार आईला ' तू पण निवेद ' खाल्लास म्हणून. ' 4 ए, आसं नाय करायचं. ये मी तुला कोकरू घेते. पण लई लांबपतूर जमायचं नाय मला." ‘बरं थोडं घे.' कांत्या शांतीच्या पाठकुळी बसला ती चालू लागली तेव्हा तिच्या ऊरात भरून आलं. पण तिच्या डाळचापुढं नैवेद्याचा घास फिरत होता. ' कांत्या नकळता हुता, पण शांती काय नकळती हाय का ?" असा आईचा सवाल तिच्या मनात फणा काढून उभा होता. कांत्या, मी यकली गेली आसती निवेद घेऊन पण त्या वढ्यात वाळवीचं झाड हाय ना, मधीच तोडलंय बग, अर्धवट, त्ये मला गोसाव्याच्या तोंडावाणी दिसतं. आज्जीच्या गोष्टीतला गोसावी आठावतो. मग भ्या वाटतं. कापरं सुटतं बग आंगाला.' निवेद । ७७