पान:रानवारा.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• कसली न्यारी ? तू तान लागल्यावर म्हाराच्या-चांबाराच्या हीरीतलं पाणी पितीसकी, म्हंतीस, 'सारी माणसंसारखीच. संमद्या आडात पाणी यकच.' मग जेवणापरीस ' निवेद ' वेगळा त्यो कसा ? " ‘ त्यो देवाचा आसतुया ' देव खातो का ? गुरवच खातो की किस्नाबरूबर त्याचं मैतर लोणी चोरायचं. भूक लागली की लोण्याचं डेरं चोरून पळवायचं नि हुंऽऽ म्हणून हाणायचं.' ह्ये तुला कुणी सांगितलं रं ?' तू पोथी ऐकायला येत न्हायीस, बापू बामणाची. बसतीस भांडी घासत, हरीइजय का काय वाचतो बामन. त्यात हाय संमद आणि कांत्याच्या बालमुखातून कृष्णाच्या लीला ऐकण्यात शांती मुग्धराधा झाली. टोपलीतला नैवेद्य तिनं भारल्यासारखा कांत्यापुढं केला. त्याचं डोळं लकाकलं. तो खुशीत येऊन पुढं सरकला आणि आवडीनं खाऊ लागला. आता त्याच्या श्रीकृष्णलीला थांबल्या होत्या. . . ... शांती मावळतीकडं बघत होती. पांढ-याशुभ्र ढगांच्या राशी लोण्याच्या पांढ-या गोळयासारख्या दिसत होत्या. मोठमोठ्या ताटात लोण्याचं गोळं ठेवावंत तसं आकाश नवनीताची ताटं भरभरून क्षितीजाच्या किनाऱ्यावर आणीत होतं. तिला आठवलं परवा ती हौसाकाकीकडं ताका- साठी गेली होती, तेव्हा तिचा दौलू पोळीवर लोण्याचा गोळा घेऊन खात होता. तिची भूकेली नजर तेथून तिला काढवत नव्हती. तिच्या तोंडास पाणी सुटलं होतं. आताही तीच स्वादाची कल्पना तिला अनावर झाली. तिचा हात नैवेद्यात गेला. तिनं नकळत एक घास तोंडात घातला. त्या खमंग चवीनं जीभ खवळली. पुन्हा घास घेण्यासाठी तिनं पुढचात पाहिलं. पण नैवेद्य संपला होता. त्याचवेळी कांत्याचं लक्ष तिच्या हालणाच्या तोंडाकडं गेलं. आणि उघडया माळावर त्याचं रडणं.. कांत्या, रडू नको रं. चुकून मी घास घेतला. माझ्या वाटणीची पोळी मी तुला दिइन. चल घरी.' ( मला आत्ता पायजे.' 4

  • आत्ता ? इथं कुठली आणू ? घरी गेल्यावर देत्ये.'

? निवेद । ७६