पान:रानवारा.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हलंच निवेद दावते, त्यो मानून घे. ह्यात आईचा कायबी दोष नाय. आमचाच गुन्हा हाथ, त्याबद्दल माफी कर. आमाला सुखी ठेव. शेतं चांगली पिकू दे. हत्नंच निवेद दावते म्हणून पुन्हा एकदा माफी मागते रं मसुबाराया.' हात जोडून तिनं शेताला मागणं मागितलं. कांत्या हे सारं बारकाईनं बघत होता. फडक्याची सुटलेली चुंबळ शांतीनं पुन्हा केली नि डोक्यावर ठेवली. टोपली उचलून ती डोक्यावर घेऊ लागली तेव्हा कांत्या बसूनच बोलला. 6 आक्का, निवेद घरी न्हेणार ?' ( 'हो. शेताला पोचला नाथ म्हणून काय रस्त्यावर टाकू ?" " पण आई कावंल तुला. म्हणंल, तिथं काय वाघाचं वाडं नि तरसाचं खेडं बांधलं हुतं का ?" त्यानं केलेल्या आईच्या हुबेहुब नकलेचं शांतीला हसू आलं. त्याच बरोबर त्याचं म्हणणंही तिला पटलं होतं. तिनं डोक्यावरची टोपली खाली ठेवली. शून्य नजरेनं ती दूरवरच्या शेताकडं पहात राहिली. आपणास पंख असते तर असा घोटाळा झाला नसता, यासारख्या विचारात ती रमून गेली. ( अक्का, मला भूक लागलीय.' ' आता घराकडंच जायाचं हाय. एवढ्या निवदाचं कायतरी पाह्यलं पायजेल.' ‘ आक्का, मी निवेद खाऊ ?' अं... 4 काय हुइल खाल्ला तर ?' • पाप हुइल.' 4 कुठलं पाप, लक्षुमीच्या देवळातला निवेद ती कुटलीबी पोरं खात्यात की.' निवेद कसा खाणार ?" ' अं, •. पण आपलाच निवेद आपुन कसा खायाचा ?' ‘ जसं जेवतो तसा खायचा. भूक लागली म्हणून खायाचा. नाय तर कोण खाईल ? ' " त्ये खरं; पण ह्यो निवेद हाय. जेवणाची गोष्ट न्यारी.' निवेद । ७५