पान:रानवारा.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आक्का मला इरूळाबी दिसला पाण्यात म्हणून मी तुझ्या पायात यायला लागलो.' कांत्या, खरंच तुला इरूळा दिसला ?" होऽऽ. तुला खोटं वाटतं व्हय ? " कसंला रं ?' " 7 ( तू आपलाच उसास ऐकला आसशील झुडुप वान्यानंबी हालतं. पण झटका दिल्यावाणी नाय हालत, 6 • पण रंग कसला हुता ? ' 4 काळा.' i ... हुता इरूळा इरूळ्यावाणीच की.. चाललया • काळा ? नि लांबीला किती ?" ‘लांबीला वावभर आसंल. ' आन् झुडपात तुला काय दिसलं का ?" ‘आक्का... लई भ्या वाटतंय माघारी जाऊया.' चल. माझ्याबी काळजात धडकी भरली बग.' • मलाबी मायंदाळं घाबारायला हुतंय, पण तू चाल्लीस म्हणून मीबी ... .... " ह्ये आपलं जाणं खरं नाय गड्या. हीरीच्या काठावरनं जायला पायापुरती वाट, एका बाजूला होर दुसऱ्या बाजूला वढा. पडलं-बिडलं तर मरानच की, शिवारात कोण चिटपाखरू दिसत नाय. ' 'आपल्या आईचं उगीचच निवदाचं फॅड. आतापातूर जेवाण झालं आसतं आपलं शेताला कोणबी निवेद देत नाय.' ' देत नाय कसं ? सारी देत्यात. येरवाळीचं दिऊन गेल्याली सारी. कैक सांचीपाराला देत्यात. आपली आई सगळ्या देवास्नी निवेद पोचल्या- बिगर जेवण करीत नाय.' नुसत झेंगट हाय.' टेकडीवर येताच कांत्यानं बसकत मारली. ‘ आरं ये येड्या कोकरा, बसू नगस. चल मावळतीच्या बाजूनं जाऊ. कसाबसा निवेद पोचवू नि जाऊ झपाझपा घरी. ' • आक्का.. J निवेद । ७३ ।७