पान:रानवारा.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फटके मारत चालू लागला. ( ह्ये बग, कांत्या, आसं चालणार नाय. एका वादाड्याचा न्हाइस. घरला हो बघू.' " मग तू मला का हासलीस ?" ‘ अं ? हं, आरं माझ्या मनाला वाटलं, आज निवेद दिऊन आल्यावर भरपेट पोळया खायाला मिळणार म्हणून हासले. ' ‘ खरं ? " .. व्हय. खरंच. ' कांत्याच्या मनाची समजूत पटली. त्यानं फाटक्या चड्डीवरचा हात सोडला आणि पहिल्या ऐटीत तो नेटाने चालू लागला. शांती ओठ आवळून हसू दाबत होती. 4 .. माळाची टेकडी उतरून ती दोघं ओढ्याच्या वाटंला लागली. इतका वेळ शांतींच्या पुढं धावणारा कांत्या आता शांतीचा हात धरून चालत होता, दोघं काहीच बोलत नव्हती. लगालगा चालली होती. आजूबाजूस कावयाबावन्या नजरेनं बघत होती. कानोसा घेत होती. एकमेकांनी टाकलेलं उसास त्यांना मोठं वाटत होतं. 'कांत्या, नीट चाल. मांजरावाणी पायात येऊ नगस. ' आक्का, तुला उसास ऐकू आला ? ' भ्या वाटल्यावर उसास वाढतो रं.' ' माझा न्हवंग.' मग कुणाचा आजगराचा.' " काय तरी भकू ' नगस.' • काय तरी नाय. त्या झुडुपात काय हाललं ?" कुठं रं ?'. . . . " त्या तिथं ग वारूळाजवळ.' .. ?' अं.. अं .. मला काय सुदीकं दिसत नाय रं.' " मी झुडुप हालल्यालं बघितलं. नाना सांगत्यात तसा आजगराचा उसासबी मी ऐकलाय.' निवेद । ७२