पान:रानवारा.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' झालंच माझं. तू निवेद बांधायला लाग.' कांत्याला संग ने.' 6 टोपलीत 'निवेद', पाण्याचा तांब्या, हळद-कुंकवाच्या पुड्या घेऊन शांती शेतावर निघाली, तेव्हा कांत्या दिडक्या चालीनं तिच्याबरोबर चालू लागला. त्याची ऐट पाहून शांती त्याच्यावर उगीचच खेकसली, ह्ये बग, नीट चालायचं आसलं तर संग ये, न्हायतर घरात बस.' ! बसलो असतो ग.. पण तू निवेद दिऊन आल्याबिगर आई जेवण देणार नाय ना.' ( .. ' बरं बरं कावळ्या, संमद खाण्यावरच ध्यान तुजं.' शांती मनाशी म्हणाली, ' त्याचंच काय आपुणबी खाण्याचाच इचार करतो की. खरं तर भूकंची येळ होऊन गेलीय. काल राती अर्ध्या पोटानंच उठावं लागलं. करणार काय ? टोपलीतच नव्हतं. आईनं तर आपल्यापरीस थोडं खाल्लं काम तर किती ढीगभर करती. जेवताना म्हणती बास झालं मला. तुमी घ्या खाऊन.' खरंच आईचं तेवढ्यानं पॉट भरत आसंल का ?' त्या विचारानं तिच्या पोटात कालवाकालव झाली. ती बिगबिगी पाय उचलू लागली, कांत्या तिच्या चालीनं चालण्याच्या प्रयत्नात उड्या घेत चालला होता. त्याचा ऊर धपापत होता. कपाळावरचा घाम तो मनगटानं पुसत होता. गोन्यापान कानशीलावर उन्हानं लाली पसरली होती. क्षणभर तिला वाटलं त्याला जवळ घेऊन कुरवाळावं, पण त्याची ही पायपीट जेवणापर्यंत वेळ काढण्यासाठी चाललेली आहे, हे तिच्या लक्षात येताच तिला हसू फुटलं. चाललेला कांत्या जागेवरच थांबून तिच्याकडे रागानं बघू लागला. त्याच्या चड्डीची मागची बाजू त्यानं एका हातानं झाकून घेतली होती. " आरं, तुला नाय मी हासत.' ' मग कुणाला ? रस्त्याला का चिचच्या झाडाला हासतीस ?" • त्यास्नी कशाला हासन' असं म्हणून शांती जास्तच घाईनं चालू लागली. कांत्या तिला निवेद । ७१