पान:रानवारा.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुमावल्यावाणी तिचं डोळं थीर झालं हुतं. चौकात येस्तोवर मागं पायलं नाय, मग मातुर जीव नाय व्हायला. माग वळून पायलंच. खोलीच्या दारात चंदा बाळाला विऊन उभी हुती. तिच्या डोळ्यात पाणी आलं आसावं. तिनं डोळयाला पदर लावला हुता; पण ती मला दुबळी वाटली नाय. बिगीन मंडई गाठली. बैल गाडीला जुपलं नि गावाची वाट धरली. तात्या दारातच उभा हुता. जणू माझी वाटत बघत हुता. त्याच्यापुढं सारा गल्ला ठिवला. त्येनं मोजलं. मी त्याच्याम्होरं उभाच हुतो, बारीक डोळं करून त्येनं बिबळ्यावाणी माझ्याकडं पायलं. अंगावर काटा उभा व्हायला. तात्यानं मला इचारलं ' यवढंच ?' 6 " त्या रांडला भाड किती दिलीस ?" ( कु.. .. कुणाला ?' 6 'तुझ्या बायलला. ' ' तिला मी एक पैसाबी दिला नाय.' " मग काय तिनं तुला भाड दिली ?' खरं तर दिली हुती. खोटं नव्हतं. पण आसलं खरं बोलणं तात्याला खरं वाटलंच नसतं, मी काइ बोललो नाय. तसाच उभा. आरं, बोल की भडव्या. का गेला हुतास तिच्याकडं ? सारं गाव माझ्या तोंडात शॅण घालील. आई-बाच्या मागं मीच तुला मोठा केला, लगीन केलं, कर्जबाजारी झालो तुझ्या भल्यासाठी आन् तू त्या येस्वा बाईकडं भेटायला जातूस ? तुला मस्ती आलीय का ? तिचं धा जणाचं प्वॉर तू संबाळायला गडी म्हणून हाणार काय तिथं? कुळ नरकात घालणार हैस का? आरं, बोल कीऽऽ. बोल.. थांब तु आसा नाय त्वांड उचकाटायचास.' त्यानं माझं थिटं हात एका हातात धरलं. खडाखड चापटी दिल्या. खाली कोलमाडलो, त्यो पिसाळला हुता जणू. पेकाटात लाथा घालू लागला. कुत्र्यावाणी माझी दशा झाली. मला आरडावं वाटंना. आरडलो- वराडलो तरी कुणी सोडवत नाय. नुसती दळिद्री नशीबाची झँघरात हुती. कशाला रडायचं ? कण्हत कुथत आंग चोरून सोसू लागलो. त्वांड मिटवून दुबळा । ६८ "