पान:रानवारा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बानं हौसनं मॉप फोटू काढलं हुतं. च्या देताना तिनं इचारलं, 'माझंच सांगत बसल्ये. तुमचं कसं चाललंय ?" मी सारं खरं त्ये सांगून टाकलं. तिला ठावं असावं म्हणलं जी म्होरं कधी वढ लागली तरी गावाकडं फिरकायची नाय. सारं ऐकून तिच्या डोळयात पाणी दाटून आलं. म्हणली, 'माझ्यामुळं तुम्हाला किती भयानक भोगायला लागलं हो. काही काssही अपराध नसताना. तुमचं असं व्हायला नको होतं. तिथं मी तुमचं जीवन पाह्यलंय. तेव्हा काळीज तिळ तिळ तुटायचं. तुम्ही बाळाला नाव लावायला परवानगी दिली. दुसऱ्या कुणी दिली नसती. तुमचे हे उपकार मी तुमची सेवा करून फेडीन. तुम्ही इथं माझ्याजवळ रहा. बाळाला सोबत म्हणून. रहाल ?" 'मी ? .... मला नाय जमणार. तात्या राहू देणार नाय.' तिथं काय आहे तुमचं ? तात्या तुम्हाला काय देतात ?" 6 ' रावताळ्याचं कर्ज फेडायचं हाय. त्येच्याकडं चाकरी हाय मी. आपल्या लग्नातलं कर्ज हाय.' ' आपल्या लग्नातलं कसलं कर्ज ? पैन पैचा खर्च बाबांनी केलाय. एक पैसासुद्धा तुमच्या भावानं खर्च केला नाही. गावाकडच्या जेवणावळीचा नि वरातीचा खर्चसुद्धा आधीच घेतला होता.' ‘त्ये काय का आसंना. मेल्यालं मढं उकरायचं बळ माझ्यात नाय. कुठंतरी कामच करायचं. त्ये रावताळ्याकडं करतो. त्यात दिस सरत्याती.' ! पण एवढा अन्याय का सहन करायचा ? त्यांना एवढं का भ्यायचं ? तुम्ही आता जाऊच नका गावाकडं.' तसं कसं ? तसं नाय जमणार बैलगाडी कणसं भरून आणलीय नेऊन सोडून या तिथं.' ' नग, नग. मी नाय व्हाणार हिथं. तात्या माझा जीव घिईल. जातो. आता नाय थांबत....' • आसं म्हणत मी बिगीन उठलो. ती माझ्याकडं बघत हुती, पण जणू तिच्या डोळ्यांच्या कवड्या झाल्या हुत्या. सान्या जगावरचा इश्वास दुबळा । ६७